व्यवसाय निर्मितीसाठी बहुजन हिताय संघटनेचे पाऊल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:28 AM2021-03-05T04:28:09+5:302021-03-05T04:28:09+5:30
चंद्रपूर : बहुजन हिताय ऑटोचालक मालक सहकारी संस्थेच्या वतीने संस्थेचे सदस्य रामअवतार वर्मा यांना आत्मनिर्भर करण्याच्या आनुषंगाने ऑटो खरेदीसाठी ...
चंद्रपूर : बहुजन हिताय ऑटोचालक मालक सहकारी संस्थेच्या वतीने संस्थेचे सदस्य रामअवतार वर्मा यांना आत्मनिर्भर करण्याच्या आनुषंगाने ऑटो खरेदीसाठी कर्ज उपलब्ध करून दिले. त्यामुळे वर्मा यांना रोजगार मिळाला आहे.
बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या आनुषंगाने बहुजन हिताय ऑटोचालक मालक सहकारी पतसंस्थेच्या आनुषंगाने प्रयत्न करण्यात येते. रामअवतार वर्मा यांना ऑटोद्वारे प्रवासी वाहतूक करण्याचा व्यवसाय सुरू करायचा होता. मात्र त्यांना भांडवल उपलब्ध नसल्याने अडचण जात होती. त्यामुळे बहुजन हिताय ऑटोचालक मालक सहकारी पतसंस्थेतर्फे सहज भांडवल उपलब्ध करून दिले. त्यातून त्यांनी ऑटो खरेदी केला. वर्मा यांना पतसंस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर हुमणे यांच्या हस्ते ऑटोची चाबी देण्यात आली. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश मांढरे, सचिव कुंदन रायपुरे, संचालक सुरेश मून, विलास जुमडे, महादेव कवाडे, रवी दुर्योधन, विजय एकोणकर, विठ्ठल बटाले, जया हुमणे, सुनीता गावंडे संघटनेचे ग्रामीण अध्यक्ष दीपक दाजगाये आदी उपस्थित होते.