मोकाट फिरणाऱ्या ५६ कुत्र्यांचे निर्बीजीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:20 AM2021-07-18T04:20:25+5:302021-07-18T04:20:25+5:30
नगरपरिषद मूलच्या सर्वच प्रभागात मोकाट फिरणाऱ्या कुत्र्याची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांवर भुंकणे, अंगावर धावून जाणे, चावा ...
नगरपरिषद मूलच्या सर्वच प्रभागात मोकाट फिरणाऱ्या कुत्र्याची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांवर भुंकणे, अंगावर धावून जाणे, चावा घेणे असे प्रकार वारंवार घडत होते. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी करताच नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने वाॅर्डावाॅर्डात फिरून मोकाट फिरणाऱ्या कुत्र्याचे सर्वेक्षण करण्यात आले. यावेळी पाळीव असलेल्या कुत्र्याला पट्टा बांधून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानंतर, बेवारस ५६ कुत्र्यांना पकडून नसबंदी करण्यात आली. ही मोहीम दहा दिवस चालणार असून, कुत्र्यांची नसबंदी केल्यानंतर तीन दिवस पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निगराणीत ठेवून, त्यानंतर ज्या ठिकाणावरून पकडले, तिथेच सोडण्यात येणार असल्याचे नगरपरिषद मूलचे आरोग्य निरीक्षक अभय चेपुरवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.