शेतकऱ्यांवरील लाठी हल्ल्याचा निषेध
By admin | Published: January 8, 2017 12:47 AM2017-01-08T00:47:11+5:302017-01-08T00:47:11+5:30
अमरावती येथे प्रहार संघटनेचे अध्यक्ष आ. बच्चू कडू यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचे नांगर आंदोलन करण्यात आले होते.
चंद्रपूर : अमरावती येथे प्रहार संघटनेचे अध्यक्ष आ. बच्चू कडू यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचे नांगर आंदोलन करण्यात आले होते. नोटबंदीमुळे देशोधडीला लागलेल्या शेतकऱ्यांनी लोकशाही मार्गाने चालविलेल्या आंदोलनावर पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला. आंदोलकांवर अश्रूधूर व पाण्याचे फवारे सोडण्यात आले. अनेक वृध्द् महिला-पुरुष या लाठीचार्जमध्ये गंभीर जखमी झाले. पोलिसाच्या या अमानुष लाठीचार्ज चा प्रहार संघटनेच्या चंद्रपूर शाखेतर्फे शुक्रवारी जटपुरा गेट येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ जाहीर निषेध करण्यात आला.
महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यानंतर आंदोलकांनी हहातात निषेधाचे फलक घेऊन सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. या आंदोलनाचे नेतृत्त्व प्रहारचे जिल्हाप्रमुख पप्पू देशमुख यांनी केले. या आंदोलनात फिरोजखान पठाण, शंकर कोटरंगे, अक्षय येरगुडे, अमोल डुकरे, इंगोले महाराज, विजय कन्नाके, विलास कन्नाके, राकेश शेंडे, भास्कर हजारे, विष्णू गरमडे, अनिल कोयचाळे, मारोती निमडर, जीवन कोटरंगे, इसाक बेग, अफरोज अली, नीलेश पिंगे, प्रवीण ताजने, बंडू तिवाडे, महादेव मुनघाटे, दशरथ गरमाडे, श्रीहरी कन्नाके, प्रफुल्ल बैरम, नीलेश पाझारे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)