अजूनही पहाडावर लालपरीचे दर्शन दुर्लभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 05:00 AM2020-08-28T05:00:00+5:302020-08-28T05:01:03+5:30
जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेला जिवती तालुका मुलभुत सोयी-सुविधापासून वंचित आहे. तालुक्याच्या विकासासाठी शासन स्तरावरून होणारे प्रयत्न अपुरे असल्याने महत्त्वाचे प्रश्न रेंगाळले जात आहे. त्यामुळे विकासकामाला खीळ बसली आहे. जिवती तालुका निर्मिती होऊन १८ वर्षांचा कालावधी लोटला आहे. मात्र तालुक्यातील समस्या तर सोडाच साधी शासनाची लालपरी बहुतांश गावात अजूनही धावली नसल्याचे चित्र आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जिवती : कोरोना आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने देशात लॉकडाऊनची घोषणा केली होती. त्यात शिथिलता दिल्यानंतर बंद असलेल्या लालपरीची चाकं फिरु लागली. आता जिल्ह्याबाहेरही ही बस जात आहे. मात्र अतिदुर्गम जिवती तालुक्यात अजूनही लालपरीचे दर्शन झालेले नाही. प्रवाशांना मिळेल त्या वाहनात शासन नियमाला बगल देत प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे परिवहन महामंडळाने जिवती तालुक्यातही बससेवा सुरू करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेला जिवती तालुका मुलभुत सोयी-सुविधापासून वंचित आहे. तालुक्याच्या विकासासाठी शासन स्तरावरून होणारे प्रयत्न अपुरे असल्याने महत्त्वाचे प्रश्न रेंगाळले जात आहे. त्यामुळे विकासकामाला खीळ बसली आहे. जिवती तालुका निर्मिती होऊन १८ वर्षांचा कालावधी लोटला आहे. मात्र तालुक्यातील समस्या तर सोडाच साधी शासनाची लालपरी बहुतांश गावात अजूनही धावली नसल्याचे चित्र आहे. ज्या गावात बस सुरू होती, तीसुध्दा कोरोना महामारीच्या काळात बंद केली आहे. सध्या तालुक्यात राजुरा-परमडोली ही ११ वाजताची एकच बस सुरू असल्याने नागरिकांना प्रवास करताना नाईलाजास्तव खासगी वाहनाचा आधार घ्यावा लागत आहे. यात क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवित असल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. यामुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे.