दगडी पाटा, वरवंटा ग्रामीण भागाचा मिक्सर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 05:00 AM2020-05-31T05:00:00+5:302020-05-31T05:00:49+5:30

काळाबरोबर घरातील वस्तु बदलल्या. या ओघात जगण्यासाठी वापरण्यात येणारी साधनेही बदलली आहेत. जुनी साधने जाऊन नवीन साधने आली. मात्र काही जुन्या साधनांनी आपली जागा आजही कायम ठेवली आहे. ‘पाटा’ हे त्यापैकीच एक साधन आहे. पाटा हा सपाट दगडापासून बनविला जातो. त्यासाठी पाथरवटांना अशा दगडांचा शोध घ्यावा लागतो.

Stone Pata, Varvanta Rural Mixer | दगडी पाटा, वरवंटा ग्रामीण भागाचा मिक्सर

दगडी पाटा, वरवंटा ग्रामीण भागाचा मिक्सर

googlenewsNext
ठळक मुद्देकांडलेल्या वस्तुंची चव न्यारी, लॉकडाऊनमुळे पाथरवटांचे नुकसान

घनश्याम नवघडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : जुन्या काळात प्रत्येक घरात अत्यावश्यक असलेल्या पाट्याची जागा आता शहरी भागात 'मिक्सर' या आधुनिक उपकरणाने घेतली. मात्र, ग्रामीण भागात अद्याप पाट्याचे अस्तित्व कायम आहे. यातून बऱ्याच कुटुंबांची उपजिविकाही सुरू असल्याचे तालुक्यात दिसून येत आहे.
काळाबरोबर घरातील वस्तु बदलल्या. या ओघात जगण्यासाठी वापरण्यात येणारी साधनेही बदलली आहेत. जुनी साधने जाऊन नवीन साधने आली. मात्र काही जुन्या साधनांनी आपली जागा आजही कायम ठेवली आहे. ‘पाटा’ हे त्यापैकीच एक साधन आहे. पाटा हा सपाट दगडापासून बनविला जातो. त्यासाठी पाथरवटांना अशा दगडांचा शोध घ्यावा लागतो. तालुक्यातील बाम्हणी येथील काही पाथरवट या पाट्यांची निर्मिती करून ते आठवडी बाजारात विक्रीसाठी आणतात. एका पाट्याची किंमत तीनशे ते सहाशे रूपयांपर्यंत असते. लॉकडाऊनमुळे पारंपरिक व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पाथरवटांचा पाटा निर्मिती हा एकमेव नसला तरी यातून कुटुंबाला हातभार मिळतो. एक पाथरवट वर्षाला सुमारे २५ ते ३० हजार रूपये मिळवितो. बाम्हणी येथे असे पाच सहा पाथरवट आहेत. पाट्यावर आजही मसाल्याचे पदार्थ वाटल्या जातात. नागभीड शहर व ग्रामीण भागात तर विविध पदार्थ वाटण्यासाठी पाट्याचाच वापर होतो. शहरातील काही कुटुंब तर मिक्सरपेक्षा पाट्यावर वाटलेल्या जिन्नसांना विशेष पसंती देतात. '

टाचविण्यातूनही मिळतो रोजगार
नेहमीच्या वापराने पाट्यावर पदार्थ वाटण्याची प्रक्रिया त्रासदायक असते. त्यामुळे पाट्याला टाचवून घ्यावे लागते. हे काम काही व्यक्ती करतात. यातूनही या पाथरवटांना थोडा रोजगार मिळतो. पाटा टाचवणारे पाथरवट गावागावात फिरून ‘आहे का पाटा टाचवायचा’ अशी हाक देत असतात. पाटा टाचविण्यासाठी ५० ते ६० रूपये असा दर असल्याची माहिती कारागीरांनी दिली.

पारंपरिक व्यवसायाची उपेक्षा
दगडांपासून विविध वस्तु तयार करणाºया जमातींची संख्या बरीच कमी आहे. काळाच्या स्पर्धेत हा व्यवसाय मागे पडल्याने पारंपरिक कारागीर नवीन व्यवसाय स्वीकारत आहेत. यातून केवळ कुटुंबांचा कसाबसा उदरनिर्वाह करता येऊ शकतो. शासनाकडून या व्यवसायाला आर्थिक पाठबळ नाही. महागाई वाढल्याने या अल्प उत्पनातून कुटुंबाच्या गरजा पूर्ण होत नाही. त्यामुळे शासनाने अशा कारागीरांसाठी योजना सुरू करण्याची मागणी पाथरवटांनी केली आहे.
 

Web Title: Stone Pata, Varvanta Rural Mixer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.