कृषी सिंचनात अडचणी आणणे बंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 12:37 AM2018-04-27T00:37:05+5:302018-04-27T00:37:05+5:30

शेतकऱ्यांच्या आयुष्यात हरितक्रांती आणण्याची क्षमता असणाºया गोसेखुर्द प्रकल्पाची चुकीच्या नियोजनामुळे वाट लावण्यात आली. हजारो हेक्टर जमीन सिंचनापासून वंचित आहे. त्यामुळे राजकारणी व कंत्राटदारांनी कृषी सिंचनात अडचणी आणणे बंद करावे,

Stop causing problems in agricultural irrigation | कृषी सिंचनात अडचणी आणणे बंद करा

कृषी सिंचनात अडचणी आणणे बंद करा

Next
ठळक मुद्देमान्यवरांचा सूर : शेतकरी परिषद

लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी: शेतकऱ्यांच्या आयुष्यात हरितक्रांती आणण्याची क्षमता असणाºया गोसेखुर्द प्रकल्पाची चुकीच्या नियोजनामुळे वाट लावण्यात आली. हजारो हेक्टर जमीन सिंचनापासून वंचित आहे. त्यामुळे राजकारणी व कंत्राटदारांनी कृषी सिंचनात अडचणी आणणे बंद करावे, असा सूर सोमवारी ब्रह्मपुरी येथे पार पडलेल्या शेतकरी परिषदेत उमटला. प्रकल्पाच्या वर्धापन दिनानिमित्त ही परिषद घेण्यात आली होती.
आमदार विजय वडेट्टीवार यांनी उद्घाटन केले. अध्यक्षस्थानी निवृत्त आयकर आयुक्त धनंजय धार्मिक तर प्रमुख पाहुणे माजी खासदार नाना पटोले, शेती प्रश्नाचे अभ्यासक अमिताभ पावडे, पी. व्ही. शेंडे, उपाकांत धांडे, निवृत्त अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी प्रभु राजगडकर आदी उपस्थित होते. २२ एप्रिल १९८८ ला राजीव गांधी यांच्या हस्ते गोसीखुर्द प्रकल्पाचे भूमिपूजन केले होते. प्रकल्पाला यंदा ३० वर्षे पूर्ण झाले. अजूनही धरणाचे पाणी शेतकºयांपर्यंत पोहोचले नाही. अशी खंत संघर्ष समितीचे संयोजक अ‍ॅड. गोविंद भेंडारकर यांनी व्यक्त केली. जनमंच संघटनेने सिंचनाच्या क्षेत्रात योगदान दिल्याबद्दल संघर्ष समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. २०१९ निवडणुका पुढे ठेवून सरकार केवळ नव्या सिंचनाची घोषणा करीत आहेत, असा आरोप उपस्थितांनी केला. प्रकल्पाच्या त्रुटींवर चर्चा झाली.
पुनर्वसनात त्रुटी
गोसीखुर्द प्रकल्पामुळे शेतकºयांना अद्याप लाभ झाला नाही. शिवाय, पूनर्वसनात अनेक त्रुटी असल्याने प्रकल्पग्रस्त शेतकरी उद्ध्वस्त झाला, अशी टीका माजी खासदार पटोले यांनी केली. हा प्रकल्प मुदतीत पूर्ण करण्यास सरकारला अपयश आले. वनकायदा, पूनर्वसन, जमीन संपादन यावर तोडगा न काढता कंत्राटदारांचे हित पाहिले जात आहे, असा आरोपही यावेळी उपस्थितांनी केला. परिषदेच्या दुसºया सत्रात प्रकल्पग्रस्त व लाभधारक शेतकºयांच्या प्रश्नांवर चर्चा झाली. अध्यक्ष प्राचार्य देविदास जगनाडे यांनी गोसेखुर्द प्रकल्पाच्या विविध पैलूंचे विवेचन केले.

Web Title: Stop causing problems in agricultural irrigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.