दलितांवरील अन्याय तत्काळ थांबवा
By admin | Published: May 11, 2014 12:14 AM2014-05-11T00:14:00+5:302014-05-11T00:14:00+5:30
दलितांवर होणारे अन्याय व अत्याचार त्वरित थांबवावे व दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (ए)
चंद्रपूर : दलितांवर होणारे अन्याय व अत्याचार त्वरित थांबवावे व दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (ए) चंद्रपूर जिल्हा यांच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांना दिले. यासाठी रिपाइंच्या शिष्टमंडळाने काल शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास जिल्हाधिकारी डॉ. म्हैसेकर यांची भेट घेत सविस्तर चर्चा केली. बौद्ध व दलित बांधवावर होणारे अन्याय, अत्याचार त्वरित थांबवावे. राज्यातील पुरोगामी सरकारच्या कार्यकाळात व केंद्र शासनाच्या शासन प्रणाली अनुसूचित जातीच्या लोकांवर अन्याय अत्याचाराचे प्रमाणात वाढ झाली आहे. हा केंद्र व राज्य शासनाचा नाकर्तेपणा आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील रिपाइंचे नेते जयप्रकाश कांबळे, जिल्हा महासचिव सिद्धार्थ पथाडे, जिल्हा सचिव राजू भगत, जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष अनुताई दहेगावकर, चंद्रपूर तालुकाध्यक्ष हंसराज वनकर, विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष बाळकुणाल आमटे यांच्या नेतृत्वात निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात एकूण नऊ मागण्यांचा समावेश आहे. यात नगर जिल्ह्यातील खरडा या गावातील नितीन आगे यांच्या मारेकरांना फाशीची शिक्षा देण्याबाबात, दलित सरपंच मनोज कसाब नानेगाव, जि. जालना यांच्या मारेकर्यांना फाशीची शिक्षा देण्याबाबत, नगर जिल्ह्यातील दलित महिलेच्या अंत्यसंस्कारास जातीय द्वेषातून विरोध करणार्यावर अॅक्ट्रासिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करून गुन्हेगारांना कठोर शिक्षा करण्याबाबत, महाराष्टÑात वाढत्या दलित अत्याचारास आळा घालण्याबाबत, चंद्रपूर शहरातील म्हाडा कॉलनीतील खुल्या जागेमधील बुद्ध मूर्ती व पंचशील ध्वज हटविण्याबाबत, गैरकृत्य करणारे व बौद्ध बांधवांवर नाहकपणे लाठीचार्ज करण्यास जबाबदार असणार्या पोलिसावर कारवाई करण्याबाबतच्या मागण्यांचा समावेश आहे. यावेळी अर्चना सोनडुले, सुविधा बांबोळे, कविता खडसे, गयाबाई गोवर्धन उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)