कृषी केंद्रांकडून बळीराजांची लूट थांबवा, अन्यथा आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:20 AM2021-07-01T04:20:23+5:302021-07-01T04:20:23+5:30

महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचे कृषी अधिकाऱ्यांना निवेदन तोहोगाव : शेतीच्या हंगामाने कृषीकेंद्रांना सुगीचे दिवस आले आहेत. गोंडपिपरी शहरासह खेडोपाडी ...

Stop looting Baliraja from agricultural centers, otherwise agitation | कृषी केंद्रांकडून बळीराजांची लूट थांबवा, अन्यथा आंदोलन

कृषी केंद्रांकडून बळीराजांची लूट थांबवा, अन्यथा आंदोलन

googlenewsNext

महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचे कृषी अधिकाऱ्यांना निवेदन

तोहोगाव :

शेतीच्या हंगामाने कृषीकेंद्रांना सुगीचे दिवस आले आहेत. गोंडपिपरी शहरासह खेडोपाडी या केंद्र चालकांनी आपली दुकाने थाटली आहेत. विस्ताराने मोठ्या असलेल्या गोंडपिपरी तालुक्यासाठी ही बाब आशादायी आहे. मात्र, कृषी केंद्रचालकांकडून ग्रामीणांच्या अज्ञानाचा फायदा घेत लूट केली जात असल्याचे दिसून येत आहे. गरीब शेतकऱ्यांची फसगत आता थांबवावी, अशी मागणी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

त्यांनी शिवसेनेचे तालुका उपाध्यक्ष हरमेलसिंग डांगी यांच्या नेतृत्त्वात गोंडपिपरीचे तालुका कृषी अधिकारी मंगेश पवार यांना नुकतेच निवेदन दिले आहे.

उद्योगविरहीत गोंडपिपरी तालुक्यात रोजगाराच्या संधी अत्यल्प आहेत. येथील नागरिक शेती आणि शेतमजुरीवर विसंबून आहेत. शेतीचा हंगाम आटोपला की, तालुक्यातील बहुतांश नागरिक लगतच्या तेलंगणासह रोजगारासाठी इतरत्र भटकताना दिसतात. मात्र, लॉकडाऊनच्या पहिल्याच वर्षी परराज्यातून परतीच्या प्रवासात झालेल्या यातनांमुळे प्रवासाची पंचायत होऊ नये, म्हणून शासनाच्या सूचनेमुळे आरोग्याची काळजी घेत घरच्या घरीच नागरिक पडून राहिले. त्यामुळे त्यांच्या हातचा रोजगार बुडाला आहे. रोजगाराअभावी घरची आवक थांबली. यातच बळीराजाने गतवर्षीचे उत्पन्न शासकीय धान्य खरेदी केंद्राला विकले. मात्र, बोनसच्या कवडीचीही रक्कम त्यांच्या खात्यात अद्याप आली नाही. संसाराचा गाडा हाकताना शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीस आला आहे. आता नव्या हंगामाची लगबग जोमात आहे. यात गोंडपिपरी शहरासह तालुक्यातील कृषी केंद्रचालकांकडून बळीराजाची होणारी लूट आता चर्चेचा विषय ठरला आहे. या कृषी केंद्रचालकांनी बी-बियाणे, खतांच्या रकमेपेक्षा अधिक रक्कम घेण्याचा सपाटा चालविला आहे. केंद्रात साहित्य असतानादेखील त्याची साठवणूक करून अधिक पैशाने विकण्याचा प्रकार गोंडपिपरीत सुरू आहे. केंद्रात दर आणि साठा फलक आहे. मात्र, त्यावर काही लिहिले जात नाही. परिणामी शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. ही लूट थांबविण्याची मागणी महाविकास आघाडीच्या या शिष्टमंडळाने केली आहे. अन्यथा जनआंदोलन उभारण्याचा इशारा या शिष्टमंडळाने दिला आहे. यावेळी शिवसेनेचे तालुका उपाध्यक्ष हरमेलसिंग डांगी, काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष महेंद्र कुनघाडकर, राष्ट्रवादीचे नेते अरुण वासलवार, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शैलेशसिंह बैस, आनंद गोहणे, अशफाक कुरेशी, विवेक राणा आदींची उपस्थिती होती.

Web Title: Stop looting Baliraja from agricultural centers, otherwise agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.