खासगी शाळांमध्ये होणारी लूट थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:20 AM2021-06-18T04:20:09+5:302021-06-18T04:20:09+5:30

ब्रम्हपुरी : कोविड-१९ विषाणूच्या महामारीमुळे मागील वर्षीपासून सर्व खासगी प्राथमिक, माध्यमिक शाळा, कॉन्व्हेंट अजूनही बंद आहेत. सरकारने १२ वीपर्यंतच्या ...

Stop looting in private schools | खासगी शाळांमध्ये होणारी लूट थांबवा

खासगी शाळांमध्ये होणारी लूट थांबवा

Next

ब्रम्हपुरी : कोविड-१९ विषाणूच्या महामारीमुळे मागील वर्षीपासून सर्व खासगी प्राथमिक, माध्यमिक शाळा, कॉन्व्हेंट अजूनही बंद आहेत. सरकारने १२ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात बढती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंबंधित विद्यार्थ्यांना शुल्कात सवलत देण्याचे सरकारने आदेश दिले आहेत. तरीसुद्धा ब्रम्हपुरी येथील शाळांतर्फे प्रवेश फी, शिक्षण शुल्काव्यतिरिक्त ग्रंथालय, संगणक व प्रयोगशाळा फी आकारण्यात येत आहे. ज्या गोष्टींचा वापर नाही, त्यांचेही शुल्क आकारल्यामुळे त्याचा अतिरिक्त भार हा पालकांवर येत आहे.

यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा-कॉन्व्हेंटनी अशा कुठल्याही प्रकारची फी पालकांकडून आकारण्यात येऊ नये, असे आदेश शाळांना दिले आहेत. तरीसुद्धा शाळांकडून प्रशासनाला न जुमानता फी आकारण्यात येत आहे. यासंदर्भात भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने खासगी शाळांमध्ये या पद्धतीने होणारी लूट थांबावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे. याबाबत भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपविभागीय अधिकारी ब्रम्हपुरी यांच्यासह पंचायत समिती सभापती, संवर्ग विकास अधिकारी व गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे. सात दिवसांच्या आत या विषयावर कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.

याप्रसंगी भा.ज.यु.मो. शहर अध्यक्ष प्रा. सुयोग बाळबुधे, जिल्हा सचिव तनय देशकर, शहर महामंत्री रितेश दशमवार, महामंत्री स्वप्नील अलगदेवे, शहर सचिव दत्ता येरावार, शहर उपाध्यक्ष प्रमोद बांगरे, अमित रोकडे, जयंत धोटे, अरुण बनकर, कृष्णा वैद्य उपस्थित होते.

===Photopath===

170621\img-20210617-wa0071.jpg

===Caption===

पंचायत समिती सभापती रामलाल दोनाडकर यांना निवेदन देतांना

Web Title: Stop looting in private schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.