महिलांकडून पुरुषांवर होणाऱा अत्याचार थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:26 AM2021-03-20T04:26:02+5:302021-03-20T04:26:02+5:30

महिलांच्या रक्षणाकरिता कायदे करण्यात आले; परंतु त्याच कायद्याने काही महिला गैरवापर करीत आहेत. त्यामुळे पोलीस विभागाने तक्रारकर्तीची नार्को ...

Stop the oppression of men by women | महिलांकडून पुरुषांवर होणाऱा अत्याचार थांबवा

महिलांकडून पुरुषांवर होणाऱा अत्याचार थांबवा

Next

महिलांच्या रक्षणाकरिता कायदे करण्यात आले; परंतु त्याच कायद्याने काही महिला गैरवापर करीत आहेत. त्यामुळे पोलीस विभागाने तक्रारकर्तीची नार्को टेस्ट करावी आणि दोषी आढळल्यास तिच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्यासोबत यासंदर्भात चर्चा शिष्टमंडळाने चर्चाही केली.

शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष डॉ. नंदकिशोर मैंदळकर, सुदर्शन नैताम, वसंत भलमे, दीपक पराते, सचिन बरबतकर, डॉ. गुरुदेव गेडाम, मोहबत खान, विनोद पिसे, नितीन चांदेकर, गंगाधर गुरनुले, राजू कांबळे, गौरव आक्केवार आदी उपस्थित होते.

बाॅक्स

तक्रार देण्यास घाबरू नका

काही महिला खोट्या बातम्या पसरवून समाजात, गावात पुरुषांची बदनामी करतात. तेव्हा पुरुषांनीही आपल्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध तक्रार द्या, घाबरू नका, लाजू नका, संपूर्ण देशात पुरुषांसाठी हेल्पलाईन उपलब्ध आहे. आपली तक्रार नोंदवा, पोलिसात तक्रार देण्यास लाजू नका, आपल्या बेसावधपणामुळे आपल्या आई-वडिलांना व घरातील मंडळींना त्रास सहन करावा लागतो. यासंदर्भात भारतीय परिवार बचाव संघटनेशी संपर्क करा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Stop the oppression of men by women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.