कोरोना रुग्णांचे हाल थांबवा, माजी मंत्र्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 04:36 PM2021-04-16T16:36:50+5:302021-04-16T16:38:09+5:30

कोरोनाची दुसरी लाट ही गंभीर स्वरूपाची असून सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातवरण पसरत आहे.

Stop the plight of Corona patients, former ministers Hansraj ahir protest outside the Collector's office | कोरोना रुग्णांचे हाल थांबवा, माजी मंत्र्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन

कोरोना रुग्णांचे हाल थांबवा, माजी मंत्र्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन

Next
ठळक मुद्देभाजपा नेते हंसराज अहीर यांनी जिल्ह्यातील वैद्यकीय व्यवस्था अधिक प्रबळ करून जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची आवश्यक ती योग्य सुविधा करण्याची मागणी केली आहे.

चंद्रपूर : जिल्ह्यात कोरोनाचे वाढते संक्रमण ही चिंतेची बाब बनली असून कोरोनाच्या रुग्णांना बेड, ऑक्सिजन तसेच व्हेंटिलेटर करिता वणवण करावी लागत आहे. जिल्ह्यातील वैद्यकीय व्यवस्था कोलमडली असताना रुग्णांचे  तसेच त्यांच्या परिवाराचे हाल होत आहे. त्यामुळे, रुग्णांच्या सोयी सुविधेसाठी माजी मंत्री हंसराज अहिर यांनी धरणे आंदोलन करुन प्रशासनाचे लक्ष वेधले. 

कोरोनाची दुसरी लाट ही गंभीर स्वरूपाची असून सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातवरण पसरत आहे. त्यामुळे, भाजपा नेते हंसराज अहीर यांनी जिल्ह्यातील वैद्यकीय व्यवस्था अधिक प्रबळ करून जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची आवश्यक ती योग्य सुविधा करण्याची मागणी घेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोरोना काळ नियमांचे पूर्णतः पालन करीत स्वतः धरणे दिले.

हंसराज अहीर यांच्या मागण्या
चंद्रपूर शासकीय महाविद्यालय महिला रुग्णालयात सेंट्रल ऑक्सिजन सिस्टम, व्हेंटिलेटर, आयसीयू च्या व्यवस्थेसह ४०० बेड उपलब्ध असतांना ते त्वरित सुरु करावे.
- डॉक्टर्सची कमी सेवाभावी आयएमए शी चर्चा करून फिजिशियन, MBBS डॉक्टर्सची गरज आहे ती विनंतीवर मागणी करून सहकार्य घ्यावे.
- जिल्ह्यातील प्रमुख शहरातील चंद्रपूर महानगरासह खाजगी रुग्णालये बालरोग रुग्णालयासह अधिग्रहित करावे.
- वेकोलिचे माजरी, घुग्घुस, बल्लारपूर चे ३ हॉस्पिटल कोविड १९ साठी त्वरित अधिग्रहित करावे.
- लालपेठ हॉस्पिटल वेकोलिचे सामान्य रुग्णालयातील एक विभाग शिफ्ट करून त्याजागी कोविड १९ चे बेड वाढवा.
- रेमडेसिवीर इंजेक्शन ची कमतरता भासणार नाही अधिक मागणी करून उपलब्ध करून घ्यावे.
- जेष्ठ डॉक्टरांसह  BAMS / BHMS व अन्य प्रॅक्टिशनर डॉक्टर्सना कोविड १९च्या सेवेकरिता मदत घ्यावी.
- होम आयसोलेट परिवार व रुग्णांसाठी खोल्यांची अडचण पाहता मंगल कार्यालये, वसतिगृह, शाळा अन्य अधिग्रहण करून गरीब कुटुंबाना व्यवस्था करून घ्यावी. महानगर पालिकेने यात पुढाकार घ्यावा.
 

Web Title: Stop the plight of Corona patients, former ministers Hansraj ahir protest outside the Collector's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.