रावण दहनाची प्रथा बंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2021 05:00 AM2021-10-13T05:00:00+5:302021-10-13T05:00:33+5:30

आदिवासी समाजात राजा रावण महान आहे. महापराक्रमी राजाचा इतिहास भावी पिढीला माहित होऊ नये व महान योद्ध्यांची प्रतिमा डागाळण्याच्या अनुषंगाने दसऱ्याच्या दिवशी रावण दहन करण्याची प्रथा जाणीवपूर्वक सनातन समाज व्यवस्थेनी सुरू केली आहे. याला आदिवासी समाजाचा विरोध आहे. आजही देशातील दक्षिण भारतातील तामिळनाडू राज्यात महात्मा रावणाची ३५२ मंदिरे असून, राजाची पूजा केली जाते.

Stop the practice of Ravana Dahan | रावण दहनाची प्रथा बंद करा

रावण दहनाची प्रथा बंद करा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जिवती : महात्मा राजा रावण मानवतावादी समृद्ध व वैभवशाली संस्कृतीचे प्रतीक आहे. निसर्गरक्षक, उत्कृष्ट समाज व्यवस्थेचा उद्गाता, समान न्याय देणारा न्यायप्रिय राजा असलेल्या आदिवासींच्या राज्याची षडयंत्रकारी सनातनी व्यवस्थेने परंपरेच्या नावाखाली प्रतारणा चालविली आहे. आदिवासी संस्कृतीचे प्रतीक संवर्धनाऐवजी संपविण्याचा प्रकार होत असून, आदिवासींच्या समूहाचा अवमान थांबविण्यासाठी ‘रावण’ दहन प्रथा कायमची बंद करण्याची मागणी तहसीलदारांना आदिवासी बांधवांनी दिलेल्या निवेदनातून केली आहे. 
 आदिवासी समाजात राजा रावण महान आहे. महापराक्रमी राजाचा इतिहास भावी पिढीला माहित होऊ नये व महान योद्ध्यांची प्रतिमा डागाळण्याच्या अनुषंगाने दसऱ्याच्या दिवशी रावण दहन करण्याची प्रथा जाणीवपूर्वक सनातन समाज व्यवस्थेनी सुरू केली आहे. याला आदिवासी समाजाचा विरोध आहे. आजही देशातील दक्षिण भारतातील तामिळनाडू राज्यात महात्मा रावणाची ३५२ मंदिरे असून, राजाची पूजा केली जाते. छत्तीसगड, मध्य प्रदेश, झारखंड व राज्याच्या मेळघाट तालुक्यात भक्तिभावाने राजा रावणाची पूजा अर्चना केली जात असून, आदिवासींच्या महान राज्याची स्मृतीला अभिवादन केले जात आहे. त्यामुळे रावण दहन प्रथेवर कायम बंदी आणावी, अशी मागणी आदिवासी समाज बांधवांनी केली. यावेळी आदिवासी विद्यार्थी संघाचे जिल्हाध्यक्ष कंटू कोटनाके, सत्तरशाह कोटनाके, सीताराम मडावी, अजगर अली, सलीम शेख, सखाराम कोटनाके, सागर कोटनाके, गंगाधर आत्राम आदी उपस्थित होते.

Web Title: Stop the practice of Ravana Dahan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dasaraदसरा