जलद बस थांब्यासाठी रस्ता रोको आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 11:14 PM2018-09-24T23:14:14+5:302018-09-24T23:14:26+5:30
तालुक्यातील विसापूर सर्वात मोठे गाव आहे. विसापूर फाट्यापासून गावाचे अंतर दोन किमीचे आहे. या फाट्यावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विभागीय नियंत्रकांनी जलद व अती जलद बसेससाठी थांबा मंजूर केला. मात्र चालकांच्या मनमानी कारभारामुळे प्रवाशांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : तालुक्यातील विसापूर सर्वात मोठे गाव आहे. विसापूर फाट्यापासून गावाचे अंतर दोन किमीचे आहे. या फाट्यावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विभागीय नियंत्रकांनी जलद व अती जलद बसेससाठी थांबा मंजूर केला. मात्र चालकांच्या मनमानी कारभारामुळे प्रवाशांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागतो. याकडे लक्ष वेधण्यासाठी विसापूर फाट्यावर सोमवारी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शेकडोवर नागरिकांनी सहभाग घेतला.
चंद्रपूर-बल्लारपूर राज्य महामार्गावरुन विसापूर फाटा ओलांडून राज्य परिवहन महामंडळाच्या चंद्रपूर, राजुरा, चिमूर, वरोरा, ब्रह्मपुरी, अहेरी व गडचिरोली आगाराच्या शेकडोवर बसेसचे आवागमन दररोज होत आहे. सर्वसाधारण, जलद व अति जलद बस थांबा २८ नोव्हेंबर २००८ रोजी विसापूर फाटा येथे मंजूर करण्यात आला. परंतु, संबंधीत आगारातील चालक जाणीवपूर्वक जलद व अती जलद बस थांबवित नाही. परिणामी ये-जा करणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. यावर कायमचा तोडगा काढण्यासाठी सोमवारी शेकडोवर नागरिकांनी रस्ता अडवून राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस रोकल्या.
चंद्रपूर जिल्ह्याचे ठिकाण असून दररोज शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, रोजगारासाठी ये-जा करणारे प्रवाशी, नोकरदार वर्ग, व्यापारी व सामान्य जनतेला जलद व अति जलद बस विसापूर फाट्यावर थांबवित नसल्याने अडचण सहन करावी लागते. परिणामी गावकºयांचा असंतोष वाढला. यावर कायमचा तोडगा निघावा म्हणून विसापूर येथील शिवाजी चौकातील मंचावर सभा घेण्यात आली.
महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दिलीप खैरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सभेत आयोजक नरेंद्र इटनकर, माजी सरपंच बंडू गिरडकर, शालीकराव भोजेकर, बबन परसूटकर, शशीकांत पावडे, रमेश लिंगमपल्लीवार, नत्थू ठाकरे, अनेकश्वर मेश्राम, महेंद्र सोरते, सुभाष हरणे, वामन गौरकार, योगेश्वर टोंगे, प्रदीप लांडगे, क्रांतीकुमार भोजेकर, अरुण बहादे आदी समर्थन मिळवून आंदोलन व्यापक करण्यासंदर्भात जनजागृती करण्यात आली. यावेळी गावातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
निवेदनाकडे केले जात होते दुर्लक्ष
विसापूर फाटा येथे जलद व अति जलद बसला थांबा मिळाला. मात्र चालकांकडून अंमलबजावणी केली जात नाही. यामुळे गावकºयात असंतोष बळावला. येथील कार्यकर्ता नरेंद्र इटनकर यांनी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांना निवेदन सादर करून समस्या सोडविण्याची विनंती केली. त्यांनी पाठपुरावा करूनही राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी लक्ष देत नव्हते. परिणामी गावकºयांचा संयम सुटला. नेहमीसाठी जलद व अतीजलद बसेस थांबाव्या म्हणून गावकºयांनी सोमवारी आंदोलनाचे हत्यार पुढे करून अधिकाºयांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.