सिनेमागृहातील बेभाव खाद्यपदार्थांची विक्री थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 10:59 PM2018-07-04T22:59:11+5:302018-07-04T22:59:36+5:30
शहरातील मल्टिफ्लेक्स सिनेमागृहात चित्रपट पाहणाऱ्यांची चित्रपट प्रेमींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र मल्टिफ्ेलेक्समध्ये खाद्य पदार्थ विक्रेते वाजवीपेक्षा अधिक दराने अन्नपदार्थांची विक्री करुन जनसामान्यांची लूट करीत आहेत. याबाबत मनसेने आक्रमक पवित्रा घेतला असून मंगळवारी शहरातील सिनेमागृहातील व्यवस्थापकांना निवेदन देऊन खाद्य पदार्थाच्या किंमती कमी करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी निवेदनातून दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शहरातील मल्टिफ्लेक्स सिनेमागृहात चित्रपट पाहणाऱ्यांची चित्रपट प्रेमींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र मल्टिफ्ेलेक्समध्ये खाद्य पदार्थ विक्रेते वाजवीपेक्षा अधिक दराने अन्नपदार्थांची विक्री करुन जनसामान्यांची लूट करीत आहेत. याबाबत मनसेने आक्रमक पवित्रा घेतला असून मंगळवारी शहरातील सिनेमागृहातील व्यवस्थापकांना निवेदन देऊन खाद्य पदार्थाच्या किंमती कमी करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी निवेदनातून दिला आहे.
शहरात दिवसेंदिवस सिनेमागृहात चित्रपट पाहणाऱ्यांचा संख्या वाढली आहे. नवा चित्रपट लागताच जिल्हाभरातील चित्रपटपे्रमी चंद्रपुरातील सिनेमागृहात गर्दी करीत असतात. याचाच फायदा घेत खाद्यविक्रेते सिनेमागृहातमध्ये अधिक दरात खाद्यपदार्थाची विक्री करीत आहेत. २० रुपयांचा पदार्थ हा २०० रुपयांना विकल्या जात आहे.
घरातील मंडळीसोबत चित्रपटगृहात चित्रपट बघणे म्हणजे आर्थिक भुर्दंड असल्याची प्रतिक्रीया सामान्य नागरिकांकडून व्यक्त होत आहेत. त्यामुळे मनसेच्या पदाधिकाºयांनी शहरातील राधाकृष्ण टॉकीजमधील व्यवस्थापकाला घेराव घालून खाद्यपदार्थाच्या किंमती कमी करुन जनसामान्यांची लूट त्वरीत थांबवावी, अन्यथा मोठे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी निवेदनातून दिला.
यावेळी मनसे जिल्हा अध्यक्ष दिलीप रामेडवार, मनविसे जिल्हा अध्यक्ष राहुल बालमवार, जिल्हा सचिव भरत गुप्ता, जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे, तालुका अध्यक्ष प्रकाश नागरकर, विवेक धोटे, महिला जिल्हाध्यक्ष सुनीता गायकवाड, तालुका शहर अध्यक्ष प्रतिमा ठाकूर, उपाध्यक्ष मयुर मदनकर, माया मेश्राम, मनोज तांबेकर, करण नायर, सतीश वाकडे, अर्चना आमटे, विमल लांडगे, शकुंतला, रंगारी, मंगला वेलादी यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.