पांढरकवडा परिसरातील अवैध दारू विक्री बंद करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:26 AM2021-03-28T04:26:17+5:302021-03-28T04:26:17+5:30
फोटो : आ. जोरगेवार यांना निवेदन देताना पांढरकडा ग्रा.पं.चे सरपंच सूरज तोतडे व महिला मंडळ. घुग्घुस: घुग्घुस पोलीस ठाण्याअंतर्गत ...
फोटो : आ. जोरगेवार यांना निवेदन देताना पांढरकडा ग्रा.पं.चे सरपंच सूरज तोतडे व महिला मंडळ.
घुग्घुस: घुग्घुस पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या पांढरकवडा गाव परिसरात दिवसेंदिवस अवैध दारू विक्रीचे प्रमाण अधिक वाढत असल्याने गावातील महिलांना त्रास होत आहे. त्यामुळे संतप्त महिलांनी जिल्हा पोलीस अधीक्षक, घुग्घुस पोलीस निरीक्षक व आ. किशोर जोरगेवार यांना सरपंच सूरज तोतडे यांच्या नेतृत्वात निवेदन देऊन अवैध दारू बंद करण्याची मागणी केली.
जिल्ह्यात दारूबंदी असली तरी घुग्घुस परिसरातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर दारू विक्री सर्रास सुरू आहे. दारू विक्रीमुळे महिलांना त्रास होत आहे. अल्पवयीन मुले दारू व्यवसायाकडे वळण्याची शक्यता निर्माण झाली आहे व काही गुंतले असल्याने आज पांढरकवडा गावच्या संतप्त महिला मंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक, घुग्घुस ठाण्याचे ठाणेदार व या क्षेत्राचे आ. किशोर जोरगेवार यांनी भेटून व चर्चा करून निवेदन दिले.