सणासुदीच्या काळात तरी रेल्वेची ‘स्पेशल’ लूट थांबवा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:34 AM2021-09-08T04:34:05+5:302021-09-08T04:34:05+5:30
बॉक्स दुप्पट भाडे कधीपर्यंत सहन करणार? दीड वर्षापासून कोरोनाच्या नावावर रेल्वेने केवळे विशेष गाड्या सुरू ठेवल्या. या गाड्यांचे प्रवासभाडे ...
बॉक्स
दुप्पट भाडे कधीपर्यंत सहन करणार?
दीड वर्षापासून कोरोनाच्या नावावर रेल्वेने केवळे विशेष गाड्या सुरू ठेवल्या. या गाड्यांचे प्रवासभाडे पूर्वीच्या भाड्यापेक्षा दुप्पट आहे. त्यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. केवळ विशेष गाड्या सुरू असल्याने आरक्षण केल्याशिवाय प्रवास करता येत नाही.
बॉक्स
जनरल डबे कधी होणार अनलॉक?
केवळ विशेष गाड्या आणि एक्स्प्रेस सुरू असल्याने त्यात आरक्षण करणे अनिवार्य आहे. जनरल डब्यांतूनसुद्धा आरक्षण असल्याशिवाय प्रवास करता येत नाही. त्यामुळे दीड वर्षापासून जनरल डबे लॉक केल्याचे चित्र आहे. त्यामुळे नियमित आणि रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा आर्थिक भुर्दंड बसत आहे.
बॉक्स
स्पेशल भाडे कसे परवडणार ?
विशेष गाड्यांमधून प्रवास करण्यासाठी आरक्षण करणे अनिवार्य आहे. तसेच यासाठी आकारले जाणारे प्रवास भाडेसुद्धा दुप्पट आहे. त्यामुळे जवळचाही प्रवास करायचे असल्यास परवडण्यासारखे नाही. त्यामुळे प्रवास भाडे कमी करावे.
- अमोल गेडाम, प्रवासी
----
मागील वर्षापासून पॅसेंजर ट्रेन बंद आहेत. त्यामुळे अनेक प्रवाशांची मोठी अडचण होत आहे. विशेष रेल्वे ही सर्वांसाठी परवडणारी नाही. पॅसेंजर गाड्या प्रवाशांना सोईच्या होत्या. त्यामुळे सर्व पॅसेंजर व लोकल गाड्या पुन्हा सुरू करण्यात याव्यात.
- धम्मदीप बोरकर, प्रवासी