बांधकामाधीन प्रकल्प पूर्ण करण्याचे धोरण

By admin | Published: May 26, 2016 02:01 AM2016-05-26T02:01:16+5:302016-05-26T02:01:16+5:30

शेतकऱ्यांच्या आयुष्यात सुख फुलविण्यासाठी सिंचनाच्या उत्तम सुविधा निर्माण करून देणे आवश्यक आहे.

Strategy to complete the project under construction | बांधकामाधीन प्रकल्प पूर्ण करण्याचे धोरण

बांधकामाधीन प्रकल्प पूर्ण करण्याचे धोरण

Next

मुंडे, महाजन मंत्रिद्वयांचे प्रतिपादन : सिंचन प्रकल्प व जलयुक्तचा आढावा
चंद्रपूर : शेतकऱ्यांच्या आयुष्यात सुख फुलविण्यासाठी सिंचनाच्या उत्तम सुविधा निर्माण करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी आधी बांधकामाधीन सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यामुळे बांधकामाधीन प्रकल्प पुर्ण करण्यासाठी तातडीने निधी दिला जाईल, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
बुधवारी हे दोन्ही मंत्री चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प तसेच जलसंधारणाचा आढावा त्यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला मंत्रिद्वयांसोबतच पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार अशोक नेते, आमदार नाना शामकुळे, बंटी भांगडिया, संजय धोटे, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले, महापौर राखी कंचर्लावार, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, मनपा आयुक्त सुधीर शंभरकर, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे व कार्यकारी अभियंता राजेश सोनोने प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रारंभी अधीक्षक अभियंता एम.जे. शेख यांनी जिल्ह्यातील हुमन या मोठ्या प्रकल्पासह मध्यम प्रकल्प तसेच उपसा सिंचन योजना व बॅरेजेसची माहिती दिली. काही प्रकल्प विविध मान्यतेसाठी अडले असून काहींना निधी नसल्याने कामे रखडली असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. जलसंपदा विभाग शेतकऱ्यांशी निगडीत विभाग आहे. नागरिकांना पिण्याचे पाणीही या विभागामार्फत पुरविले जाते. त्यामुळे या विभागास पारदर्शक बनविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे यावेळी ना. महाजन यांनी सांगितले. पाण्याचे नियोजन करताना सुक्ष्म सिंचन पध्दतीला प्राधान्य दिले जात असून पाण्याचा ३० ते ४० टक्के अपव्यय थांबविण्यासाठी कार्यक्रम आखला जात असल्याचे ते म्हणाले.
जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे यांनीही जलसंधारण विभाग व जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाकडून प्रकल्पनिहाय माहिती जाणून घेतली. जलयुक्त शिवार अभियानाच्या प्रगतीचा आढावा जाणून घेताना जूनपर्यंत यासाठी उपलब्ध असलेला पूर्ण निधी खर्च करण्याचे निर्देश त्यांनी दिले. जलसंधारणाची कामे करताना शोषखड्डे, नदी पुनर्जीवन आदी कामे प्राधान्याने घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या. रस्त्यांचा मोठा कार्यक्रम जिल्ह्यात राबविण्याच्या सूचना त्यांनी केल्या. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही यावेळी जलसंपदा व जलसंधारणाच्या जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर प्रकाश टाकला. जिल्ह्यात अधिकाधिक सिंचन क्षमता निर्माण होऊन शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी जलसंपदा व जलसंधारण मंत्र्यांनी सहकार्य करावे, असे ते म्हणाले. बैठकीत पाणी गुणवत्तेबाबत निरीच्यावतीने सादरीकरण करण्यात आले. बैठकीस जलसंपदा, जलसंधारण या विभागांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Strategy to complete the project under construction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.