पथदिव्यांची वीज खंडित होऊ देणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:27 AM2021-08-29T04:27:15+5:302021-08-29T04:27:15+5:30
चिमूर : मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे आर्थिक स्थिती डबघाईस आली आहे. याचा फटका ग्रामीण भागात निर्माण झालेला असून, गावाच्या ...
चिमूर : मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे आर्थिक स्थिती डबघाईस आली आहे. याचा फटका ग्रामीण भागात निर्माण झालेला असून, गावाच्या विकासकामांसाठी केंद्र सरकार १५ व्या वित्त आयोगांतर्गत निधी देत असताना राज्य शासन ढवळाढवळ करीत असल्याचा आरोप करीत सरपंच प्रफुल्ल कोलते यांनी गावातील पथदिव्यांची वीज खंडित होऊ देणार नाही असे आश्वासन दिले.
केंद्र सरकारकडून गावाच्या विकासकामांसाठी १५ व्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतीला मिळत असतो. दरम्यान, राज्य शासन गावाच्या विकासकामांचा निधी हा अनावश्यक बाबींमध्ये खर्च करण्याचा निर्णय काढून गावाच्या विकासकामास कमजोर करीत आहे. राज्य शासन ढवळाढवळ करीत असल्याने जिल्ह्यातील सरपंच संघटनेने निषेध करण्याचे आवाहन सरपंच प्रफुल्ल कोलते यांनी केले आहे. महावितरणने जबरदस्ती करू नये. पथदिव्यांची वीज खंडित होऊ देणार नाही असे भाजयुमो माजी जिल्हा उपाध्यक्ष व मांगलगावचे सरपंच प्रफुल्ल कोलते यांनी सांगितले.