कृषी, आरोग्यसेवा बळकट करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 12:22 AM2017-10-04T00:22:48+5:302017-10-04T00:23:00+5:30

शेतकरी हा शासनाच्या प्रत्येक योजनांनी लाभान्वित झाला पाहिजे, त्यांच्या आर्थिक उत्कर्षासाठी योजना, प्रशिक्षण सुविधा, सल्ला आणि आवश्यक तिथे थेट मदत पोहचली पाहीजे.

Strengthen agriculture, healthcare | कृषी, आरोग्यसेवा बळकट करा

कृषी, आरोग्यसेवा बळकट करा

Next
ठळक मुद्देहंसराज अहीर : जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शेतकरी हा शासनाच्या प्रत्येक योजनांनी लाभान्वित झाला पाहिजे, त्यांच्या आर्थिक उत्कर्षासाठी योजना, प्रशिक्षण सुविधा, सल्ला आणि आवश्यक तिथे थेट मदत पोहचली पाहीजे. शासनाच्या विविध योजना केवळ कागदावरच न राहता जनतेपर्यंत पोहचल्या पाहिजे, त्यासाठी अधिकाºयांनी कर्तव्य नव्हे, दायित्व म्हणून काम करावे, असे आवाहन केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांनी केले.
जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची आढावा बैठक मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवनात पार पडली. व्यासपीठावर आमदार अ‍ॅड. संजय धोटे, जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, मनपा आयुक्त संजय काकडे, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे, जिल्हा दक्षता समितीचे सदस्य खुशाल बोंडे, सर्व पंचायत समितीचे सभापती, सर्व गट विकास अधिकारी, नगरपालिकांचे नगराध्यक्ष, सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते .
या बैठकीमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, पंडित दिनदयाल उपाध्याय अंत्योदय योजना, पंडित दिनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, राष्ट्रीय सामाजिक साहाय्यता कार्यक्रम, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत अभियान, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, पीक विमा, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, पंडीत दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना, शामाप्रसाद मुखर्जी शहरी उपक्रम, कौशल्य विकास, अमृत योजना याशिवाय विविध पायाभूत सुविधांचा आढावा घेण्यात आला.
२०२२ पर्यंत शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्यात यावे, सर्वांना मूलभूत आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश ना. अहीर यांनी दिले. तत्पूर्वी त्यांनी कृषी विभागाच्या योजना आणि त्याची अंमलबजावणी याबाबत दुर्गम भागातील लोकप्रतिनिधींशी चर्चा केली. यावेळी योजनांची माहिती, प्रशिक्षण, सवलती आणि सुविधा देण्याबाबत चर्चा झाली.
पालिकांनी सादर केला आढावा
बैठकीत प्रधानमंत्री आवास योजनेतील वरोरा, भद्रावती, बल्लारपूर आदी नगरपालिकांनी आपला आढावा सादर केला. शहरातील उपलब्ध जागा, डीपीआर पूर्ण करणे आदीबाबत चर्चा करण्यात आली. उज्वला गॅस वितरण योजनेबद्दल यावेळी चर्चा झाली. गॅस वितरण संदर्भात तक्रारी राहणार नाही, याची सूचना करण्यात आली. कृषी, आरोग्य आणि पायाभूत सुविधांवरही चर्चा झाली.
आरोग्य केंद्रातील रिक्त पदे भरण्याचे निर्देश
राष्ट्रीय आरोग्य अभियान आढावा अंतर्गत ५८ प्राथमिक आरोग्य केंद्राचा आढावा घेण्यात आला. रिक्त पदांमुळे ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा आजारी होता कामा नये, अशी सूचना ना. अहीर यांनी केली. दुर्गम भागात वैद्यकीय अधिकारी तातडीने देण्यात यावे, असे निर्देश देत एकात्मिक बाल विकास योजना अंतर्गत प्रलंबित अंगणवाडी बांधकाम संदर्भात चर्चा करण्यात आली.

Web Title: Strengthen agriculture, healthcare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.