शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकरी सोसायट्यांना मजबूत करा
By admin | Published: May 23, 2016 01:02 AM2016-05-23T01:02:38+5:302016-05-23T01:02:38+5:30
तालुक्यात शेतकऱ्यांची अवस्था फार वाईट आहे. शेतकऱ्यांच्या धानाला भाव नाही, कर्जमाफी नाही, अशा विवेचंनात शेतकरी सापडला आहे.
विजय वडेट्टीवार : काँग्रेस कार्यकर्त्यांना आवाहन
सिंदेवाही: तालुक्यात शेतकऱ्यांची अवस्था फार वाईट आहे. शेतकऱ्यांच्या धानाला भाव नाही, कर्जमाफी नाही, अशा विवेचंनात शेतकरी सापडला आहे. त्यांचे हात बळकट करायचे असेल तर शेतकरी सोसायट्यांना मजबूत करण्याचा सल्ला आ. विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेसतर्फे आयोजित शेतकऱ्यांच्या बैठकीत दिला.
काही दिवसात शेतकऱ्यांची कैवारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विविध कार्यकारी संस्थेचे निवडणूक होत आहे. या निवडणुकीत काँग्रेस समर्थीत शेतकरी सहकार विकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांना विजयी करुन सोसायट्याला मजबूत करण्याचे आवाहन क्षेत्राचे आमदार तथा विधीमंडळाचे उपगटनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती अरविंद जयस्वाल, व्यापारी राहुल पटेल, काँग्रेसचे कार्याध्यक्ष अरुण कोलते, सहकार नेते मधु बोरकर, सुनिल उट्टलवार, लोनवाहीचे सरपंच गणेश गोलपल्लीवार, रिपाइंचे सुदाम खोब्रागडे, शेतकरी वासुदेव पा. बोरकर, मुरर्लीधर मेंढुळकर, हरिभाऊ बारेकर, राईस मिलचे अध्यक्ष प्रा. घनश्याम सोनवाणे उपस्थित होते. यावेळी शेकडो शेतकऱ्यांनी आपआपली मते मांडली. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाची भूमिका शेतकऱ्यांविषयी व निवडणुकी विषयी काय असावी, हे स्पष्ट केले. सर्वाची उत्तरे आ. वडेट्टीवार यांनी दिली. विविध कार्यकारी सोसायटी निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या सर्व उमेदवारांचा परिचय देण्यात आला. आगामी होणाऱ्या नगरपंचायत जि.प., पं.स. निवडणुकीची आखणी करण्यासाठीही यावेळी विचारमंथन करण्यात आले. (शहर प्रतिनिधी)