पाणीदार जिल्ह्यासाठी स्वप्नाला बळ द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 12:30 AM2019-07-29T00:30:30+5:302019-07-29T00:30:51+5:30

जिल्ह्यातील प्रत्येक शेतापर्यंत सिंचनाचे पाणी पोहचवण्याचा आपला प्रयत्न आहे. जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासाकरिता आपण तत्पर असून सिंचनाच्या माध्यमातून पाणीदार जिल्ह्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बळ द्या, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन, वनेमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

Strengthen your dream for a watery district | पाणीदार जिल्ह्यासाठी स्वप्नाला बळ द्या

पाणीदार जिल्ह्यासाठी स्वप्नाला बळ द्या

Next
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : दिव्यांगांना मोफत स्वयंचलित तीनचाकी सायकलचे वितरण

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यातील प्रत्येक शेतापर्यंत सिंचनाचे पाणी पोहचवण्याचा आपला प्रयत्न आहे. जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासाकरिता आपण तत्पर असून सिंचनाच्या माध्यमातून पाणीदार जिल्ह्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बळ द्या, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन, वनेमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
प्रधानमंत्री खनिज निधी अंतर्गत ब्रह्मपुरी येथे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत आयोजित दिव्यांगांना मोफत स्वयंचलित तीन चाकी सायकल वितरण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, समाज कल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, समाज कल्याण अधिकारी सुनील जाधव, माजी आमदार अतुल देशकर आदींची उपस्थिती होती.
एक हजार दिव्यांगांना मोफत स्वयंचलित तीनचाकी सायकल वाटप करणारा चंद्रपूर हा प्रथम क्रमांकाचा जिल्हा असून शेवटच्या पात्र दिव्यांगांना स्वयंचलित तीन चाकी सायकल मिळेपर्यंत ही योजना सुरूच राहणार आहे. त्यामुळे कोणताही दिव्यांग स्वयंचलित तीन सायकलीपासून वंचित राहणार नाही. जो जगासाठी काम करतो त्याच्यासाठी काम करणे ही सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे आॅटोरिक्षा चालकांना हक्काची घरं प्रदान केली असून बांधकाम कामगारांनाही पाच लाख रुपयांपर्यंत मोफत घर मिळणार आहे. त्याकरिता नोंदणी सुरू असून बांधकाम कामगारांनी नोंदणीत सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
८० टक्के दिव्यांग असणाऱ्या बांधवांना हक्काचं घर देता याव याकरिता राज्याच्या अर्थसंकल्पात शंभर कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद केलेली आहे. तसेच अनुसूचित जातींच्या कुटुंबाकरिता ७ हजार घरे उपलब्ध करून देण्यात येणार असून अनुसूचित जमातीच्या शबरी महामंडळामार्फत राबवल्या जाणाºया घरकुल योजनेत घरांची संख्या वाढवण्यात येणार आहे.
अधिकाऱ्यांवर होणार कारवाई
विधवा, निराधार, परितक्त्या, घटस्फोटीत महिलांना मिळणारे ६०० रुपयाचे अनुदान हे आता १ हजार रुपये व दोन अपत्ये असणाºया महिलांना बाराशे रुपये मिळणार आहे. हे अनुदान वेळेवर मिळण्याकरिता सरकारच्या माध्यमातून शासन निर्णय निर्गमित करण्यात येणार असून अनुदान वितरणात विलंब करणाºया अधिकाºयांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. आजही काही महिला जंगलातून लाकूडफाटा आणून चुलीवर स्वयंपाक करत असल्याने त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. परंतु जिल्ह्यात सुरू झालेली शंभर टक्के गॅस कनेक्शन योजनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाला मोफत गॅस कनेक्शन मिळणार आहे.
ओबीसींच्या घरांची संख्या वाढवली
ओबीसी बांधवांना घरकुल मिळावे याकरिता केंद्र सरकारने या घरांची संख्या वाढवली आहे. त्याचा फायदा चंद्रपूर जिल्ह्यातील ओबीसी बांधवांना होणार आहे, त्यामुळे या बांधवांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
शेतीसाठी विविध योजना
जिल्ह्याच्या स्पर्धा परीक्षेतील नोकºयांमध्ये टक्का वाढावा याकरिता सुरू केलेले मिशन सेवा, २०२४ च्या आॅलिंपिक स्पर्धेमध्ये चंद्रपूरच्याही युवकांनी मेडल प्राप्त करावे याकरिता सुरू केलेले मिशन शक्ती, मिशन शौर्यच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांनी एव्हरेस्ट शिखर सर केलं. तसेच शेतकऱ्याच्या विकासाकरिता विविध योजना राबवण्यात आल्या असून शेतीचे उत्पादन वाढवण्याकरिता सिंचन उपलब्ध व्हावे. या दृष्टिकोनातून जिल्ह्याला पाणीदार करण्यात येणार आहे.

Web Title: Strengthen your dream for a watery district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.