शुभांगीच्या मारेकऱ्यांवर कठोर कारवाई करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 11:17 PM2018-03-27T23:17:12+5:302018-03-27T23:17:12+5:30

दहेगाव (तुळजापूर) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धापकी शिवारात शुभांगी पिलाजी उईके हिची हत्या करण्यात आली. या प्रकरणाची चौकशी करून दोषींना फाशी द्यावी, या मागणीचे निवेदन गोंडवाणा गणतंत्र पार्टीचे जिल्हाध्यक्ष मनोज आत्राम यांनी मुख्यमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

Strict action should be taken against the killers of Shubhangi | शुभांगीच्या मारेकऱ्यांवर कठोर कारवाई करावी

शुभांगीच्या मारेकऱ्यांवर कठोर कारवाई करावी

Next
ठळक मुद्देमागणी : गोंडवाना गणतंत्र पार्टी

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : दहेगाव (तुळजापूर) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धापकी शिवारात शुभांगी पिलाजी उईके हिची हत्या करण्यात आली. या प्रकरणाची चौकशी करून दोषींना फाशी द्यावी, या मागणीचे निवेदन गोंडवाणा गणतंत्र पार्टीचे जिल्हाध्यक्ष मनोज आत्राम यांनी मुख्यमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
१९ मार्चला वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील दहेगाव येथील शुभांगी उईके ही मुलगी आपल्या मैत्रिणीकडे साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी गेली असता, विवेक लोटे व त्याच्या साक्षीदारांनी शुभांगीवर अत्याचार करून तिची हत्या केली. या घटनेला आठ दिवसांचा कालखंड लोटूनसुद्धा आरोपी मोकाट आहेत. त्यामुळे त्या आरोपींना तत्काळ अटक करुन सदर केस जलद न्यायालयात चालविण्यात यावी, महाराष्ट्र शासनाने कुटुंबाला तात्काळ २० लाख रुपयांचा धनादेश द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. तसेच मागणीचे निवेदन जिल्हाधिकारीमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.
यावेळी गोंडवाना गणतंत्र पार्टीचे जिल्हाध्यक्ष मनोज आत्राम, आॅल इंडिया एम्प्लाईज फेडरेशनचे सचिव प्रा. धिरज शेडमाके, राष्ट्रीय सचिव गोंडराजे विरेंद्रशहा आत्राम, जिल्हा संघटक नामदेव शेडमाके, संघटनेचे उपाध्यक्ष सारंग कुमरे, गुणवंत नैताम आदी उपस्थित होते.

Web Title: Strict action should be taken against the killers of Shubhangi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.