आदिवासी बांधवांचा धडक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 01:05 AM2017-08-10T01:05:49+5:302017-08-10T01:06:30+5:30

आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी जागतिक मूलनिवासी गौरव दिन उत्सव समितीच्या नेतृत्वात आदिवासी बांधव बुधवारी मोर्चाच्या स्वरुपात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले.

Strike Front of Tribal Brothers | आदिवासी बांधवांचा धडक मोर्चा

आदिवासी बांधवांचा धडक मोर्चा

Next
ठळक मुद्देमागण्यांची पूर्तता करा : जिल्हाधिकाºयांमार्फत राज्यपालांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी जागतिक मूलनिवासी गौरव दिन उत्सव समितीच्या नेतृत्वात आदिवासी बांधव बुधवारी मोर्चाच्या स्वरुपात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. यावेळी हजारो आदिवासी बांधव मोर्चात सहभागी झाले होते.
सदर मोर्चासाठी जिल्हाभरातील आदिवासी बांधव येथील जिल्हा कारागृहातील शहीद भूमीजवळ एकत्रित आले. त्यानंतर हा मोर्चा गांधी चौक, जयंत टॉकीज चौक, प्रियदर्शिनी चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. गोंडवाना विदर्भ राज्य निर्माण करण्यात यावे, कोलमाईन्समध्ये गेलेल्या आदिवासींच्या जमिनी व इतर लोकांच्या जमिनी संबंधित शेतकºयास परत देण्यात याव्या, जल, जंगल, जमिनीवर स्थायी आदिवासी लोकांच्या अधिकार देण्यात यावे, आदिवासी जमीन विक्रीचा कायदा कडक करण्यात यावा, जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र वसतिगृहाची निर्मिती करावी, जिल्ह्याच्या ठिकाणी स्वतंत्र आदिवासी सांस्कृतिक सभागृह विभागामार्फत बांधण्यात यावे, ६ जुलै २०१७ च्या सुप्रिम कोर्टाच्या आदेशाची विनाविलंब अंमलबजावणी करावी, १५ जून १९९५ व २१ आॅक्टोबर २०१५ हे शासन निर्णय परिपत्रक तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात यावे, पेसा कायद्याची अंमलबजावणी प्रभावाने करावी, आदी मागण्या यावेळी लावून धरण्यात आल्या.
त्यानंतर एका शिष्टमंडळाद्वारे जिल्हाधिकाºयांमार्फत महामहीम राज्यपालांना निवेदन पाठविण्यात आले, अशी माहिती प्रा. धीरज शेडमाके, मनोज आत्राम यांनी दिली. मोर्चात आदिवासींच्या विविध संघटना सहभागी झाल्या होत्या.
सांकेतिक मूक सत्याग्रह
अखिल भारतीय आदिवासी युवा परिषद चंद्रपूरच्या वतीने जागतिक आदिवासी दिवस तथा ९ आॅगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून ३३ अन्यायग्रस्त आदिवासींच्या न्याय हक्कासाठी बुधवारी सकाळी ९ ते १० वाजेपर्यंयत जटपुरा गेट येथील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याखाली सांकेतिक मूक सत्याग्रहाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रम हा अखिल भारतीय आदिवासी युवा परिषद चंद्रपूरचे अध्यक्ष अ‍ॅड. विकास धकाते व महासचिव विजय सोनकुसरे यांच्या नेतृत्वात घेण्यात आला. सत्याग्रहात रवी उमाटे, किरण खाडीलकर, नरेंद्र बैरम, कविता जुनोनकर, दीपक खाडीलकर, विश्वास निमजे, विनोद धकाते, शितल सोरते, अनिता बैरम, नितीमा नंदूरकर, लता चिमूरकर, रश्मी नंदूरकर, रूपेश धकते, स्मिता धकाते, वसुधा सोरते, प्रगती महतकर व समाज बांधव सहभागी झाले होते.
 

Web Title: Strike Front of Tribal Brothers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.