दाताळा मार्गावर दगडफेकीच्या घटनांमुळे दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 11:35 PM2018-01-30T23:35:06+5:302018-01-30T23:35:49+5:30

येथील दाताळा मार्गावर रात्रीच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत दुचाकी व चारचाकी वाहनांवर दगडफेक होत असल्याने नागरिकांत दहशत पसरली आहे.

Striking incidents on the Dathla road caused panic | दाताळा मार्गावर दगडफेकीच्या घटनांमुळे दहशत

दाताळा मार्गावर दगडफेकीच्या घटनांमुळे दहशत

googlenewsNext
ठळक मुद्देकारच्या काचा फोडल्या : १५ दिवसातील दुसरी घटना

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : येथील दाताळा मार्गावर रात्रीच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत दुचाकी व चारचाकी वाहनांवर दगडफेक होत असल्याने नागरिकांत दहशत पसरली आहे. सोमवारी रात्री १०.५० वाजता जीवनज्योती कॉलनी जगन्नाथबाबानगर, दाताळा रोड येथे घरासमोर उभ्या असलेल्या एका कारवर अज्ञात इसमाने दगडफेक करून काचा फोडल्या. गेल्या १५ दिवसातील ही दुसरी घटना आहे.
सोमवारच्या रात्री १०.५० वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे समाजसेवा अधीक्षक उमेश सिताराम आडे हे एमएच २९ एआर १९८५ या क्रमांकाची सुझूकी सेंट्रो कार दाताळा मार्गावरील जीवनज्योती कॉलनी जगन्नाथ बाबानगर येथील घरासमोर उभी करून ठेवली होती. दरम्यान, काही अज्ञात इसमांनी कारवर दगडफेक करून रॉड व लाकडाने कारच्या काचा फोडल्या. याबाबत उमेश आडे यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.
या मार्गावर यापूर्वी १६ जानेवारीला सुद्धा अशाच प्रकारे होंडा कारचा पाठलाग करून अज्ञात इसमांनी दगडफेक केली होती. या घटनेतही कारचे मोठे नुकसान झाले होते. १५ दिवसानंतर पुन्हा अशीच घटना घडल्याने या मार्गावर जाणाऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे. पोलिसांनी दगडफेक करणाऱ्यांचा शोध घेवून कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
पोलिसांनी अज्ञात इसमावर गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. या मार्गावर नेहमीच वर्दळ राहत असल्याने लुटण्यासाठी अशा घटना घडत असल्याची नागरिकांत चर्चा आहे.

Web Title: Striking incidents on the Dathla road caused panic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.