अत्याचाराच्या 'त्या' घटनेचा कोरपनात सर्वपक्षीय निषेध

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2024 12:25 PM2024-10-04T12:25:18+5:302024-10-04T12:26:20+5:30

मोर्चा काढून संताप : सर्वपक्षीय मोर्चात काँग्रेस पक्षाला मात्र बगल

Strong all-party condemnation of 'that' incident of torture | अत्याचाराच्या 'त्या' घटनेचा कोरपनात सर्वपक्षीय निषेध

Strong all-party condemnation of 'that' incident of torture

लोकमत न्यूज नेटवर्क 
कोरपना:
कोरपना येथील एका शाळेतील मुलीवर शिक्षकाकडूनच लैंगिक अत्याचार झाल्याप्रकरणीच्या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत. गुरुवारी (दि. ३) या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत सर्वपक्षीय निषेध मोर्चा काढण्यात आला.


या निषेध मोर्चात आरोपी शिक्षकाविरुद्ध कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. यात शहरातील विविध पक्षांचे राजकीय नेते, विविध शाळेतील विद्यार्थी व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. हा मोर्चा शहरातील जिल्हा परिषद शाळेपासून राजीव गांधी चौक, बसस्थानक मार्गे वणी रोडवरील हनुमान मंदिर परिसरापर्यंत काढण्यात आला. यानंतर निषेध सभा पार पडली. 


यावेळी मोर्चेकरांनी घोषणाबाजी केली. आरोपीला कायद्यानुसार कडक कारवाई करण्याच्या मागणीचे फलक नागरिकांनी हातात घेतले लेते महिला या मोर्चामध्ये सहभागी होऊन आरोपीविरुद्ध संताप व्यक्त केला. विद्यार्थ्यांची संख्याही लक्षवेधी होती. 


यावेळी माजी आमदार अॅड संजय धोटे, सुदर्शन निमकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश सचिव सय्यद आबिद अली, शेतकरी संघटनेचे जिल्हाप्रमुख अरुण पाटील नवले, किशोर बावणे, भूषण फुसे, 'मनसे'चे प्रकाश बोरकर, रमाकांत मालेकर, श्रीनिवास मुसळे, अमोल आसेकर आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. 


काँग्रेसचा वेगळा निषेध मोर्चा 
शिक्षकाकडून शाळकरी मुलीवर करण्यात आलेल्या लैंगिक अत्याचारप्रकरणी काँग्रेसतर्फे वेगळा निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाच्या माध्यमातून दोषर्षीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. हा मोर्चा शहरातील मुख्य मार्गाने निघून बसस्थानक परिसरात विसर्जित झाला. येथे निषेध सभा पार पडली. याप्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक विजय बावणे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उत्तम पेचे, नगराध्यक्ष नंदा बावणे, इस्माईल शेख, नगरसेवक नितीन बावणे, सुरेश मालेकर, संभाजी कोवे, गणेश गोडे, वहाबभाई यांच्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक सचिन भोयर, उद्धवसेनेचे डॉ. प्रकाश खनके आदी उपस्थित होते.


मुनगंटीवारांचे पोलिस प्रशासनाला निर्देश 
काँग्रेसच्या एका युवा पदाधिकाऱ्याने १२ वर्षीय बालिकेवर बलात्कार केला. हे प्रकरण गंभीर आहे. आरोपीच्या कुटुंबातील अनेक लोक राजकारणी आहेत. संबंधित शाळेत यापूर्वीही असा प्रकार घडल्याचा आरोप महिलांनी केला होता. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शाळेची मान्यता रद्द करण्याचा मुद्दा मांडण्यात येईल. या प्रकरणातील सर्व आरोप शोधून काढण्याचे निर्देश राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांना दिले.


पोलिस अधीक्षक दाखल 
अत्याचार प्रकरणात दोन मोर्चे निघाल्याने पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी आज तत्काळ कोरपना येथे भेट दिली व माहिती जाणून घेतली.


काँग्रेस पदाधिकाऱ्यांना केले वेगळे

  • या सर्वपक्षीय मोर्चाला येथील काँग्रेस पक्षानेही पाठिंबा दिला व काँग्रेस पदाधिकारी मोर्चासाठी जिल्हा परिषद शाळेजवळ जमा झाले. 
  • मात्र इतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना मोर्चात सहभागी करून घेतले नाही. 
  • त्यामुळे या सर्वपक्षीय आंदोलनात राजकीय द्वेषही दिसून आला. अनेकांनी वेगवेगळी मते नोंदविली.

Web Title: Strong all-party condemnation of 'that' incident of torture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.