गडचांदूर तालुका निर्मितीसाठी संघर्षयात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 11:51 PM2017-12-08T23:51:06+5:302017-12-08T23:51:29+5:30
शहरात अनेक उद्योग आहेत. सिमेंट कारखान्यांमुळे औद्योगिक शहर म्हणून गडचांदूरची ओळख निर्माण झाली.
आॅनलाईन लोकमत
गडचांदूर : शहरात अनेक उद्योग आहेत. सिमेंट कारखान्यांमुळे औद्योगिक शहर म्हणून गडचांदूरची ओळख निर्माण झाली. मात्र, तालुक्याचा दर्जा नसल्याने विकास रखडला आहे. शासनाने या शहराला तहसीलचा दर्जा द्यावा, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी गडचांदूर तालुका संघर्ष समितीच्या वतीने शुक्रवारी बेलमपूर ते गडचांदूर-राजुरा संघर्ष यात्रा काढण्यात आली.
गडचांदूरपासून पाच किमी अंतरावर असणाºया बेलमपूर येथून सकाळी नऊ वाजता संघर्ष यात्रेला सुरुवात झाली. गडचांदूर येथे ही यात्रा पोहोचल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला संघर्ष समितीच्या पदाधिकाºयांनी पुष्पमाला अर्पण करून आदरांजली वाहिली. संघर्ष यात्रेत गडचांदूर, बैलमपूर, थुट्रा, लखमापूर, धामनगाव, हरदोना, नांदा, बिबी आणि आवारपूर येथील शेकडो नागरिक विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक संघटना, पत्रकार संघाचे पदाधिकारी सहभागी झाले होते. शहरातील प्रमुख मार्गाने निघालेलली संघर्ष यात्रा राजुरा येथे पोहोचल्यानंतर भवानी माता मंदिरमार्गेउपविभागीय कार्यालयासमोर पोहोचली. गडचांदूर तालुका झालाच पाहिजे, अशी घोषणा नागरिकांनी केली. शिष्टमंडळाने नायब तहसीलदार नक्षीने यांना निवेदन देऊन विविध मागण्यांकडे लक्ष वेधले. संघर्ष यात्रेत भजनी मंडळही सहभागी झाले होते. संघर्ष यात्रा उपविभागीय कार्यालयात पोहोचल्यानंतर सभेत रूपांतर झाले. आ. संजय धोटे यांनी संघर्ष समितीचे निवेदन स्वीकाले. दरम्यान, गडचांदूरला तालुका घोषीत करण्यासाठी पाठपुरावा करू. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन तालुका निर्मितीसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन आ. धोटे यांनी दिले. या संघर्ष यात्रेत समितीचे अध्यक्ष तुळशिराम भोजेकर, मुख्य संघटक उद्धव पुरी, सचिव अशोक उमरे, नगराध्यक्ष विजयालक्ष्मी डोहे, राकाँचे नितेश ताजने, न. प. उपाध्यक्षा आनंदी मोरे, नगरसेवक शरद जोगी, डॉ. के. आर. भोयर, नगरसेवक हरिभाऊ मोरे, सुरेखा गोरे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सचिन भोयर, नगरसेवक सतिश उपलेंचवार, गोपाल मालपानी, ग्रा. पं. चे माजी सदस्य हफीज भाई, रमेश काकडे, विक्रम येरणे, भारिप बहुजन महासंघचे अध्यक्ष संजय उके, रिपाइंचे अध्यक्ष मदन बोरकर, प्रभाकर खाडे, रफीख शेख, नासीर खान, मुमताज अली आदींसह शेकडो नागरिक उपस्थित होते.