आहाराच्या जाचक अटीविरूद्ध विद्यार्थी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 11:23 PM2018-04-28T23:23:24+5:302018-04-28T23:23:24+5:30

शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना आहाराची रक्कम थेट आधारसंलग्न बँक खात्यात टाकण्याचा निर्णय सरकारने घेतला. या निर्णयाचा विरोध करीत तो निर्णय रद्द करण्यात यावा, या मागणीचे निवेदन सम्यक विद्यार्थी आंदोलनतर्फे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आदिवासी विभागाचे मंत्री विष्णू सावरा यांना देण्यात आले.

Student aggressive against dietary supplements | आहाराच्या जाचक अटीविरूद्ध विद्यार्थी आक्रमक

आहाराच्या जाचक अटीविरूद्ध विद्यार्थी आक्रमक

Next
ठळक मुद्देसम्यक विद्यार्थी आंदोलन : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना आहाराची रक्कम थेट आधारसंलग्न बँक खात्यात टाकण्याचा निर्णय सरकारने घेतला. या निर्णयाचा विरोध करीत तो निर्णय रद्द करण्यात यावा, या मागणीचे निवेदन सम्यक विद्यार्थी आंदोलनतर्फे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आदिवासी विभागाचे मंत्री विष्णू सावरा यांना देण्यात आले.
शासकीय आदिवासी वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना यापूर्वी दैनंदिन मेनूप्रमाणे भोजन दिले जात होते. हा निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा होता मात्र कोणतेही कारण नसताना राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाने जुनी अट रद्द करून विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात आहाराची रक्कम जमा करण्याचा तुघलकी निर्णय घेतला. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सरकारविरूद्ध तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
हा निर्णय विद्यार्थ्यांच्या सोयीचा नसून आर्थिक गैरव्यवहाराला चालणा देणारा आहे. त्यामुळे सरकारने तातडीने निर्णय रद्द करावा, न्यायमूर्ती एम.जी. गायकवाड समितीच्या शिफारशीनुसार जो भ्रष्टाचार झाला आहे. आणि त्यावरील करंदीकर समितीच्या अहवालानुसार आदिवासी विकास विभागाने दोषी अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदार यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे, तसेच गैरव्यवहार करणाºयांकडून रक्कम वसुली करावी, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्य खरेदीतील भ्रष्टाचारांवर कारवाई करून शैक्षणिक साहित्याचा दर्जा सुधारावा, सायकली, खेळांचे साहित्य हे ब्रॅण्डेड कंपन्यांचे पुरविण्यात यावे, आश्रम शाळांची दुरुस्ती ही सर्टिफाईड आर्किटेक्टच्या सल्ल्यानुसार नामवंत बांधकाम कंपनीकडून करण्यात यावी, आश्रम शाळेच्या इमारतीच्या खोल्यांचे वर्षातून दोन वेळा दुरुस्ती करावी तसेच जंतुनाशक फवारणी करावी, आदिवासी विद्यार्थ्यांची वर्षातून दोन वेळा आरोग्य तपासणी करावी, तसेच त्यांना आरोग्य पत्रिका देण्यात यावी, वसतिगृह आणि आश्रम शाळेतील विद्यार्थिनींना विनामूल्य ब्रॅण्डेड सॅनिटरी नॅपकीनचा पुरवठा बारमाही करावा, आदा मागण्यांचे निवेदन सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने जिल्हाधिकाºयांमार्फत आदिवासी मंत्री विष्णू सावरा यांना निवेदन पाठविण्यात आले.
निवेदन देणाºया शिष्टमंडळात सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष धिरज तेलंग, मिथून खोब्रागडे, विनोद बोरीकर, मनोज लांडे, शिरीजकुमार गोगुलवार, तिरुपती जिमडी, सागर वरघणे, अविनाश सोदरकर, आम्रपली कांबळे, सचिन ठावरी, अभय डोंगरे, लोकेश कोटरंगे आदी उपस्थित होते.

Web Title: Student aggressive against dietary supplements

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.