नीट परीक्षेत कमी गुण मिळाल्याने चंद्रपूर जिल्ह्यात विद्यार्थिनीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2021 10:25 PM2021-11-02T22:25:34+5:302021-11-02T22:26:20+5:30
Chandrapur News मैत्रिणीपेक्षा कमी गुण मिळाल्याच्या निराशेतून एका विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे घडली.
चंद्रपूर : आपल्यासोबत राहणा-या मैत्रिणीपेक्षा आपल्याला नीट परीक्षेत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थिनीने घरातच ओढणीचा गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी राजुरा शहरातील रामनगर वसाहतीत घडली.
कृष्णा नंदकिशोर पिलारे (१९) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीचे नाव आहे.
नंदकिशोर पिलारे हे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. त्यांची धाकटी मुलगी कृष्णा नांदेड येथे नीटचा अभ्यास करीत होती. या निकालात तिला मैत्रिणीपेक्षा कमी गुण मिळाले. याचे शल्य तिला बोचत होते. सोमवारी ती व तिची मोठी बहीण वरच्या मजल्यावर पुस्तक वाचत होत्या. मोठी बहिण कामासाठी खोलीतून निघताच कृष्णाने पंख्याला ओढणी बांधून आत्महत्या केली. शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.