सर्पदंशाने विद्यार्थ्याचा मृत्यू; चंद्रपुरातील घटना

By साईनाथ कुचनकार | Published: July 11, 2023 07:49 PM2023-07-11T19:49:17+5:302023-07-11T19:49:36+5:30

वडिलांसोबत शेतात गेलेल्या एका विद्यार्थ्याचा सर्पदंशाने मृत्यू झाला.

Student dies of snakebite Incident in Chandrapur | सर्पदंशाने विद्यार्थ्याचा मृत्यू; चंद्रपुरातील घटना

सर्पदंशाने विद्यार्थ्याचा मृत्यू; चंद्रपुरातील घटना

googlenewsNext

चंद्रपूर : वडिलांसोबत शेतात गेलेल्या एका विद्यार्थ्याचा सर्पदंशाने मृत्यू झाला. ही घटना नागभीड तालुक्यातील ओवाळा येथे मंगळवारी घडली. अमित संतोष महाडोळे (वय १३, रा. ओवाळा) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.

मंगळवारी सकाळी वडिलांसोबत तो शेतात गेला होता. शेतातील पाळीवर काम करीत असताना सापाने दंश केला. ही बाब त्याने वडिलांना सांगितली. त्याला लगेच तळोधी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर झाल्याने नागभीड येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अमितच्या अकाली मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Web Title: Student dies of snakebite Incident in Chandrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.