राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विद्यार्थी गौरव समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:36 AM2021-02-27T04:36:59+5:302021-02-27T04:36:59+5:30

सिंदेवाही : शिक्षण विभाग पंचायत समिती सिंदेवाही तथा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट) चंद्रपूरच्या वतीने विषयतज्ज्ञ नावीन्यपूर्ण उपक्रम ...

Student Pride Ceremony on the occasion of National Science Day | राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विद्यार्थी गौरव समारंभ

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विद्यार्थी गौरव समारंभ

Next

सिंदेवाही : शिक्षण विभाग पंचायत समिती सिंदेवाही तथा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट) चंद्रपूरच्या वतीने विषयतज्ज्ञ नावीन्यपूर्ण उपक्रम अंतर्गत राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून सिंदेवाही तालुक्यातील माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय गणित स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्या विद्यार्थ्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी संजय पालवे होते. प्रमुख अतिथी विषयतज्ज्ञ प्रा. भारत मेश्राम, प्रा. डाॅ. माधव वरभे, प्राचार्य उदय श्रीराम व मुख्याध्यापक लोमेश अगडे उपस्थित होते.

यावेळी तालुकास्तरीय गणित स्पर्धेतील अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय भारत विद्यालय नवरगावचा दहावीचा विद्यार्थी ओमप्रकाश गहाने, सर्वोदय ज्युनिअर कालेजची बारावीची विद्यार्थिनी सरोज संतोष लोखंडे व प्राजक्ता विद्यामंदिर सिंदेवाहीचा नववीचा विद्यार्थी गौरव यांना मान्यवरांच्या हस्ते ट्राॅफी, प्रशस्तीपत्र व रोख पुरस्कार प्रदान करण्यात आले.

प्रस्ताविक प्रा. भारत मेश्राम यांनी, तर सूत्रसंचालन शिक्षिका माधुरी बोंडगुलवार यांनी केले. आभार शिक्षक धनोज खोब्रागडे आभार मानले.

Web Title: Student Pride Ceremony on the occasion of National Science Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.