समाजकार्यच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 10:44 PM2019-09-16T22:44:50+5:302019-09-16T22:45:11+5:30
वसतिगृह अधीक्षक पदासाठी बीएसडब्ल्यू, एमएसडब्ल्यूची पात्रता वगळून डी फार्म, ए. एन. एम, जि. एन. एम व तत्सम पॅरामेडिकल कोर्स करण्याचा शासनाने नवा जीआर काढला आहे. मात्र त्यामुळे समाजकार्य पदवीचे शिक्षण घेणाºया उमेदवारांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे हा जीआर रद्द करण्याच्या मागणीसाठी स्थानिक सुशिलाबाई रामचंद्रराव मामीडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क पडोली चंद्रपूर अंतर्गत आजी-माजी विद्यार्थी संघटना व समाजकार्य पदवीधिकारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करुन मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : वसतिगृह अधीक्षक पदासाठी बीएसडब्ल्यू, एमएसडब्ल्यूची पात्रता वगळून डी फार्म, ए. एन. एम, जि. एन. एम व तत्सम पॅरामेडिकल कोर्स करण्याचा शासनाने नवा जीआर काढला आहे. मात्र त्यामुळे समाजकार्य पदवीचे शिक्षण घेणाºया उमेदवारांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे हा जीआर रद्द करण्याच्या मागणीसाठी स्थानिक सुशिलाबाई रामचंद्रराव मामीडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क पडोली चंद्रपूर अंतर्गत आजी-माजी विद्यार्थी संघटना व समाजकार्य पदवीधिकारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करुन मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
समाजकार्याच्या पदवीमध्ये विद्यार्थी समाजकार्याचे तंत्र, कौशल्य, पद्धती, पायºया, व्यक्ती सहयोग कार्य, गटकार्य, समुदाय संघटन, समाजकल्याण प्रशासन, सामाजिक क्रिया, सामाजिक संशोधन या महत्त्वाच्या विषयाचे अध्ययन करतात. त्यासोबत समाजशास्त्र, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, समाजकार्याचे तत्वज्ञान आदी विषयाचा अभ्यास करण्यात येतो. त्यामुळे सदर विद्यार्थी आदिवासी आश्रम शाळा व वसतिगृहात शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांचे योग्य समुपदेशन करु शकतात. मात्र शासनाने आदीवासी आश्रमशाळा व वसतिगृह येथील अधीक्षक व गृहपाल पदाची समाजकार्य पदवी वगळली. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला असून ते बेरोजगार होणार आहेत. त्यामुळे तो जीआर रद्द करण्याच्या मागणीसाठी समाजकार्य विद्यार्थ्यांनी आंदोलन करुन आपले निवेदन जिल्हाधिकारी मार्फत अदिवासी विभागाच्या प्रधान सचिवाला पाठविले.