विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेश उत्साहात
By admin | Published: June 26, 2014 11:08 PM2014-06-26T23:08:52+5:302014-06-26T23:08:52+5:30
शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. तत्पूर्वी गावातून रॅली काढून जनजागृती करण्यात आली. गुरुवारी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुस्तकदिन साजरा करण्यात आला.
गावागावातून प्रभोधन रॅली: जिल्हाधिकारी, मुख्यकार्यपालन अधिकाऱ्यांनी दिली भेट
चंद्रपूर : शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. तत्पूर्वी गावातून रॅली काढून जनजागृती करण्यात आली. गुरुवारी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुस्तकदिन साजरा करण्यात आला. दरम्यान, विद्यार्थ्यांना पुस्तक वितरीत करण्यात आले.
पहिल्या दिवशी घोडपेठ येथील जिल्हा परिषद शाळेला जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी भेट दिली. त्यांच्यासोबत शिक्षणाधिकारी रामदास पाटील उपस्थित होते. तर लोहारा येथील शाळेला मुख्य कार्यपालन अधिकारी आशुतोष सलिल यांनी भेट दिली. त्यांच्यासोबत गटशिक्षणाधिकारी रामटेके, विस्तार अधिकारी बाबुराव मडावी आदी उपस्थित होते. चिंचाळा तसेच पांढरकवडा येथे शिक्षणाधिकारी रविकांत देशपांडे तसेच अन्य कर्मचाऱ्यांनी भेट देवून पहाणी केली. तर, बल्लारपूर पंचायत समितीअंतर्गत शाळांमध्ये डायट कॉलेजचे प्राचार्य शरदचंद्र पाटील यांनी भेट दिली. तत्पूर्वी प्रत्येक गावांमध्ये शिक्षक तथा विद्यार्थ्यांनी रॅली काढून जनजागृती केली. तसेच नवगतांचे स्वागत करण्यात आले. कोणीही शाळाबाह्य विद्यार्थी राहू नये यासाठी शिक्षक तसेच शाळा समिती सदस्यांनी गृहभेटी दिल्या. सकाळपासून ध्वनिवर्धकावर देशभक्तीपर गीत वाजवून शाळेत येणाऱ्या बालकांच्या मनात देशाविषयीची भावना जागृत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आज सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे फूल देऊन स्वागत केले. (नगर प्रतिनिधी)