विद्यार्थ्यांनी अडविली एसटी बस

By admin | Published: September 20, 2016 12:44 AM2016-09-20T00:44:30+5:302016-09-20T00:44:30+5:30

बसमध्ये बसायला जागा मिळत नसल्याने संतप्त झालेल्या शालेय विद्यार्थी व गावकऱ्यांनी ...

Students avoided the ST bus | विद्यार्थ्यांनी अडविली एसटी बस

विद्यार्थ्यांनी अडविली एसटी बस

Next

शैक्षणिक नुकसान : दुसऱ्यांदा बस रोखली
गोवरी : बसमध्ये बसायला जागा मिळत नसल्याने संतप्त झालेल्या शालेय विद्यार्थी व गावकऱ्यांनी सोमवारी दुसऱ्यांदा राजुरा आगाराच्या एसटी बसची वाट अडविली व अतिरिक्त बस देण्याची मागणी केली. जोपर्यंत अतिरिक्त बस मिळणार नाही, तोपर्यंत बससमोरुन कोणीही हलणार नाही, असा पवित्रा विद्यार्थी व गावकऱ्यांनी घेतल्याने आधीच बसमध्ये बसलेल्या प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. गोवरी येथील बसस्थानकावर अतिरिक्त बसच्या मागणीसाठी दोन्ही बाजुकडील वाहतूक विद्यार्थी व गावकऱ्यांनी रोखून धरल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
शिक्षणापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहू नये, यासाठी शासन कोट्यवधी रुपयाचा खर्च करते. मात्र तिच योजना निट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली नाही तर त्या योजनेचे सार्थक होत नाही. अशीच स्थिती सध्या गोवरी, चिंचोली, माथरा, पोवनी येथील विद्यार्थ्यांची झाली आहे. राजुरा येथे शिक्षणाच्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी राजुरा येथे जातात. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी रोज प्रवास करावा लागत असल्याने राजुरा आगाराने बस पासची सोय उपलब्ध करून दिली. मानव विकास मिशन अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी बस आहे. परंतु त्या बसमध्ये विद्यार्थ्यांऐवजी प्रवासी बसून राहत असल्याने समोरील बसस्टॉप वरील विद्यार्थ्यांना बसायाला जागा मिळत नाही. राजुरा-गोवरी-मार्डा हा ग्रामीण भागातील प्रवासासाठी लांबचा टप्पा आहे. एकदा बस सुटली की पुन्हा मिळत नाही. या उद्देशाने प्रवासीही बसमध्ये दाटी करतात. त्यामुळे बस पास असूनही विद्यार्थ्यांना बसमध्ये जागा मिळत नाही. विद्यार्थ्यांचे होत असलेले शैक्षकि नुकसान लक्षात घेता गोवरीचे सरपंच सुनील उरकुडे यांनी वारंवार राजुरा आगार व्यवस्थापकाकडे अतिरिक्त बस देण्याची मागणी केली. पंधरा दिवसांपूर्वी बससाठी शालेय विद्यार्थ्यांनी असाच हंगाम केला होता. तेव्हा आठ दिवसात दुसरी अतिरिक्त बस देण्यात येईल, असे सांगण्यात आले व वेळ मारुन नेली.
मात्र १५-२० दिवसाचा कालावधी उलटून गेल्यानंतरही बस मिळण्याची कोणतीच चिन्हे दिसत नसल्याने सोमवारी सकाळी गोवरीचे सरपंच सुनील उरकुडे, तंटामुक्त अध्यक्ष गोपीनाथ जमदाडे यांचे नेतृत्त्वात गावकरी व विद्यार्थ्यांनी अतिरिक्त बसची मागणी करीत तब्बल दीड तास वाहतूक रोखून धरली. जोपर्यंत दुसरी अतिरिक्त बस मिळत नाही तोपर्यंत वाहने जाऊ देणार नाही, असा पवित्रा गावकरी व विद्यार्थ्यांनी घेतला होता. त्यामुळे अनेकांना तातकळत रस्त्यावरच उभे राहावे लागले. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना आजही नाईलजाने घराकडे परतून जावे लागले. दररोज ५० हुन अधिक विद्यार्थ्यांना घरी राहावे लागत असल्याने शैक्षणिक नुकसान होत आहे. (वार्ताहर)

राजुरा-गोवरी- मार्डा या बसमध्ये आधीच प्रवासी बसून राहात असल्याने आम्हा विद्यार्थ्यांना बसमध्ये जागा मिळत नाही. बस पास असूनही बसअभावी आम्हाला नाईलाजाने बसस्टॉप वरुन घराकडे परत जावे लागते. त्यामुळे आमचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
- गितांजली पाचभाई
विद्यार्थिनी, गोवरी

Web Title: Students avoided the ST bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.