विद्यार्थ्यांनो, चंद्रज्योतीच्या बिया खाऊ नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 01:37 AM2017-12-29T01:37:54+5:302017-12-29T01:38:04+5:30

ग्रामीण भागातील शाळा-विद्यालयांत चंद्रज्योतीच्या बिया खाल्याने विद्यार्थ्यांना विषबाधा होण्याच्या घटना वाढीस लागल्या़ त्यामुळे पालकांमध्ये भीती निर्माण झाली. विद्यार्थ्यांनी या बियांपासून सावध राहावे, ......

Students, do not eat the seeds of the moon god | विद्यार्थ्यांनो, चंद्रज्योतीच्या बिया खाऊ नका

विद्यार्थ्यांनो, चंद्रज्योतीच्या बिया खाऊ नका

Next
ठळक मुद्देइको-प्रो : बियांविषयी जिल्हा परिषद शाळांमध्ये जागृती मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ग्रामीण भागातील शाळा-विद्यालयांत चंद्रज्योतीच्या बिया खाल्याने विद्यार्थ्यांना विषबाधा होण्याच्या घटना वाढीस लागल्या़ त्यामुळे पालकांमध्ये भीती निर्माण झाली. विद्यार्थ्यांनी या बियांपासून सावध राहावे, यासाठी इको-प्रो संस्थेच्या वतीने सिंदेवाही तालुक्यातील नांदगाव येथील जिल्हा परिषद शाळेपासून जागृती मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे़
नागभीड तालुक्यातील कोर्धा, सिंदेवाही तालुक्यातील नांदगांव, रत्नापूर आणि चंद्रपूर शहरातील एका शाळेत चंद्रज्योतीच्या बिया खाल्याने विद्यार्थ्यांना विषबाधा झाली होती. अशा घटना सतत घडत असतानाही शालेयस्तरावर तसेच ग्रामीण भागात जागृती केली जात नाही. यातून विद्यार्थ्यांचे आयुष्य धोक्यात येऊ शकते. हा प्रकार टळावा, यासाठी इको-प्रो संस्था, शिक्षण विभाग व आपातकालीन व्यवस्थापन विभाग समितीच्या वतीने नांदगाव येथील जिल्हा परिषद शाळेपासून जागृती अभियान सुरू करण्यात आले. गावातुन जनजागृती पदयात्रा काढली. विद्यार्थ्यांनी हातात जनजागृती फ लक घेऊन प्रबोधनपर घोषणाबाजी केली. ‘खाऊ नका, खाऊ नका, चंद्रज्योतीच्या बिया खाऊ नका’ या घोषणेने गाव दणाणून गेले होते. इको-प्रो अध्यक्ष बंडू धोतरे यांनी चंद्रज्योतीच्या बियांविषयी शास्त्रीय माहिती देऊन जागृती केली. चंद्रज्योतीच्या बियांमुळे काय परिणाम होतात, यासंदर्भात कार्यकर्ते विद्यार्थ्यांना सहजसोप्या भाषेत समजावून सांगत आहेत. यावेळी मुख्याध्यापिका सरिता गाजलवार, इको-प्रो शिक्षण विभाग प्रमुख रवी गुरनुले, अभय अमृतकर, अरूण सहारे, शिक्षक अनिल लोणबले, शालिकराम नागापूरे, शालिनी कोचे, सविता कावडकर, संरपच अर्चना नन्नावरे, माजी संरपच दादाजी नन्नावरे, नांदगाव येथीलनम्रता चांदेकर, वर्षा गहाणे, वृंदा गहाणे, अर्चना कुमर,े पोलीस पाटील जया बोरकर, भगवान मेश्राम, नितीन बुरडकर, धमेंद्र लुनावत, अनिल अडगुरवार, रवींद्र गुरनुले, विजय हेडाऊ, संजय सब्बनवार, सुमीत कोहळे, अभय अमृतकर, राजू काहीलकर, बिमल शहा, हरीश मेश्राम, वैभव मडावी, रोशन धोतरे व ग्रामस्थ आदी सहभागी झाले होते़
कशी आहे चंद्रज्योती-जेट्रोफा ?
चंद्रज्योती, रतनज्योत आणि रान एरंड म्हणून ही वनस्पती ओळखली जाते. बिया खाल्यास मुलांना विषबाधा होते. वारंवार उलट्या व ओटी-पोटीत वेदना होतात. तोंडातून फेस येतो. ग्रामीण भागात मुलांना जेट्रोफा वनस्पतीच्या बिया म्हणजे ‘खायचे फळ ’ असा समज आहे. रस्ताच्या कडेला किंवा शाळेमागे व शेतात झुुडुपांसारखी वाढलेली ही वनस्पती पाहायला आकर्षक आहे. त्यामुळे काजुच्या बिया समजून मुले बिया फोडून खातात. यातून विषबाधा होते. शिक्षक व पालक घाबरून प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करतात. मात्र, गावखेड्यांत वेळेवर उपचार मिळत नाही. चंद्रज्योतीच्या बिया न खाण्याबाबत राज्यातील सर्वच शाळांतून जनजागृती करण्यासाठी शासनाने जिल्हा परिषद शाळांना निर्देश द्यावे. ज्या परिसरात ही वनस्पती असेल तिथे ग्रामपंचायतीमार्फत सूचना फलक लावावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री तथा अर्थ नियोजन व वनमंत्री सुधीर मुनंगटीवार यांच्याकडे इको-प्रो चे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी केली आहे.

Web Title: Students, do not eat the seeds of the moon god

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.