विद्यार्थ्यांनी अनुभवला क्वॉडकॉप्टरचा थरार
By admin | Published: July 15, 2015 01:19 AM2015-07-15T01:19:50+5:302015-07-15T01:19:50+5:30
लोकमतने आयोजित केलेल्या ‘क्वॉड कॉप्टर शो’ला मंगळवारी दुसऱ्या दिवशीही उदंड प्रतिसाद मिळाला.
Next
चंद्रपूर : लोकमतने आयोजित केलेल्या ‘क्वॉड कॉप्टर शो’ला मंगळवारी दुसऱ्या दिवशीही उदंड प्रतिसाद मिळाला. ‘क्वॉडकॉप्टर’ हा आगळावेगळा शो बघण्यासाठी उसळलेल्या गर्दीमुळे जवळपास सर्वच शाळांचे मैदान विद्यार्थ्यांच्या गर्दीने फुलून गेले होते. लोकमतच्या ‘संस्काराचे मोती- जरा हटके’ या उपक्रमांतर्गत हा विशेष शो चंद्रपूर जिल्ह्यातील सहभागी शाळामध्ये मंगळवारी आयोजित करण्यात आला होता. पीबीएस एरो हबचे उदयन देशमुख यांनी दोन क्वॉडकॉप्टरच्या माध्यमातून शाळांमध्ये प्रात्यक्षिके करून दाखविली. शो च्या दुसऱ्या दिवशी दहा शाळांमधील सुमारे सात हजारांवर विद्यार्थ्यांनी या ज्ञानवर्धक उपक्रमाचा लाभ घेतला.