विद्यार्थी मूलच्या बसस्थानकावर रात्री ताटकळत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 11:28 PM2017-08-30T23:28:46+5:302017-08-30T23:29:10+5:30

मूल तालुक्यातील पिपरी दीक्षित, येरगाव या गावाकडे जाणाºया विद्यार्थी- विद्यार्थिनीना मूलच्या बसस्थानकावर तब्बल पाच तास ताटकळत बसची वाट पाहावी लागल्याची पाळी आली.

The students hide the night at the basement bus station | विद्यार्थी मूलच्या बसस्थानकावर रात्री ताटकळत

विद्यार्थी मूलच्या बसस्थानकावर रात्री ताटकळत

Next
ठळक मुद्देबस आलीच नाही : नियंत्रकांचा खासगी बसने जाण्याचा सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : मूल तालुक्यातील पिपरी दीक्षित, येरगाव या गावाकडे जाणाºया विद्यार्थी- विद्यार्थिनीना मूलच्या बसस्थानकावर तब्बल पाच तास ताटकळत बसची वाट पाहावी लागल्याची पाळी आली. सायंकाळी ५ वाजता बसस्थानकावर आलेल्या विद्यार्थ्यांना रात्री १० वाजता दुसºया बसची सोय उपलब्ध झाल्यानंतर परतीचा प्रवास करावा लागला. बसस्थानकावर असलेल्या नियंत्रकांनी मात्र विद्यार्थ्यांना यादरम्यान, खाजगी बसने जाण्याचा सल्ला देऊन आपली जबाबदारी झटकल्याचा आरोप विद्यार्थी व प्रवाशांनी केला आहे.
राज्याचे अर्थ नियोजन व वनमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांचे क्षेत्र असलेल्या या मतदार संघात विद्यार्थ्यांना कुठलाही त्रास होऊ नये, यासाठी सतत तत्परता दाखविली जाते. असे असताना एस.टी. महामंडळाच्या कर्मचाºयांच्या हेकेखोर प्रणालीमुळे विद्यार्थ्यांना २८ आॅगस्टला त्रास सहन करावा लागला. मूल तालुक्यातून टेकाडी गावाजवळ येणाºया बसमध्ये बिघाड झाल्याने बस आली नाही. इयत्ता ११ व १२ वी मध्ये शिकणारे विद्यार्थी- विद्यार्थिनी बसची वाट बघत होते. सायंकाळ झाली तरी बस न आल्याने विद्यार्थी चांगलेच वैतागून गेले. याबाबत बसस्थानकावर कामावर असलेल्या नियंत्रकांना विद्यार्थ्यांनी विचारणा केल्यावर उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारुन नेण्याचे काम केले. त्यानंतर विद्यार्थी व प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन याबाबत चंद्रपूर आगाराला कळविण्यात आले. दोन तासानंतर बस येईल, त्यानंतर गावाकडे जाता येईल, असे सांगण्यात आले. मात्र रात्री १० वाजता विद्यार्थ्यांसाठी बस आली आणि विद्यार्थी घरी परतले. विशेष म्हणजे, यावेळी बसस्थानकावर एक बस उपलब्ध असल्याने तीच बस येरगाव, पिपरी दीक्षित गावाकडे पाठविण्याची विनंती विद्यार्थ्यांनी केली. मात्र कर्मचारी नसल्याचा बहाना करुन विद्यार्थी व पालकांना हुलकावनी देण्यात आली. बस उपलब्ध असताना कर्मचाºयांचा बहाना करुन विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवण्याचा प्रकार अशोभनिय असल्याचा आरोप नागरिकांनी केला. मानव विकास मिशन अंतर्गत महाराष्टÑ शासनाने एसटी महामंडळाला बसेस पुरविल्या. मात्र ज्याच्यासाठी बसेस आहेत, त्यांनाच ताटकळत राहावे लागते, ही फार मोठी शोकांतिका असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

बसविषयी बसस्थानकावर असलेल्या नियंत्रकांना विचारणा केली असता विद्यार्थी व प्रवाशांनी खाजगी बसेसनी जावे. याबाबत आपण काहीच करु शकत नाही, असे बोलून त्यांनी वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थी आक्रमक झाल्यानंतर चंद्रपूरला याबाबत कळविले. दोन तासांनी बस येईल, असे सांगण्यात आले. रात्री जवळपास १० वाजता बसची व्यवस्था झाली.
- ताराचंद नागापूरे माजी सरपंच येरगाव

Web Title: The students hide the night at the basement bus station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.