बससेवेकरिता विद्यार्थी आगारावर धडकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:52 AM2020-12-17T04:52:42+5:302020-12-17T04:52:42+5:30
कोरपना : राजुरा आगारातील नारंडा,वनोजा, कढोली(खु) येथील बससेवा सुरू करण्याबाबत भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांनी राजुरा ...
कोरपना : राजुरा आगारातील नारंडा,वनोजा, कढोली(खु) येथील बससेवा सुरू करण्याबाबत भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांनी राजुरा आगार येथे धडक देत राजुरा आगार प्रमुख आशिष मेश्राम यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली.
कोरोनामुळे लॉकडाऊन होण्यापूर्वी सदर बससेवा सुरू होत्या परंतु लॉकडाऊन झाल्यामुळे सर्व बससेवा बंद करण्यात आल्या आता महाराष्ट्र शासनाने अनलॉक करत सर्व विद्यालये व महाविद्यालये सुरू करण्याच्या निर्णय घेतला त्यामुळे विद्यार्थ्यांना बससेवेची अत्यंत आवश्यकता होती परंतु बससेवा बंद असल्यामुळे अडचण निर्माण होत होती,विद्यार्थ्यांनी सदर बाब भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष ताजने यांच्या निदर्शनास आणून दिली,सदर विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन राजुरा आगार येथे आगार प्रमुख मेश्राम यांना सदर बससेवा लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी केली .आपण सदर बससेवा तात्काळ सुरू करू असे आश्वासन त्यांनी विद्यार्थ्यांना दिले.
यावेळी अजय तिखट,मयूर महाडुले, प्रज्वल लांडगे,रोशन मालेकर, मदन काकडे,हर्षल चामाटे,मयुरी जुमनाके, पूजा मोहूर्ले,जानवी चुर्हे, प्रांजली मत्ते,अंजली वेट्टी,फालगूनी लोहे, कोमल मत्ते, प्रतीक्षा लोहे,सलोनी लोहे, प्रिया मूक्के, अश्विनि बोरकर,मीनल रोगे,वैष्णवी पाचभाई उपस्थित होते.