विद्यार्थ्यांनी पक्ष्यांसाठी ठेवले शाळा परिसरात पाणी व खाद्यपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:28 AM2021-03-26T04:28:05+5:302021-03-26T04:28:05+5:30

घुग्घुस : बागला चॅरिटेबल ट्रस्टद्वारा संचालित सरस्वती विद्यामंदिर म्हातारदेवीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या शाळा परिसरातील झाडावर पक्ष्यांसाठी पाणी व खाद्य ...

Students kept water and food containers for the birds in the school premises | विद्यार्थ्यांनी पक्ष्यांसाठी ठेवले शाळा परिसरात पाणी व खाद्यपात्र

विद्यार्थ्यांनी पक्ष्यांसाठी ठेवले शाळा परिसरात पाणी व खाद्यपात्र

Next

घुग्घुस : बागला चॅरिटेबल ट्रस्टद्वारा संचालित सरस्वती विद्यामंदिर म्हातारदेवीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या शाळा परिसरातील झाडावर पक्ष्यांसाठी पाणी व खाद्य पात्राची व्यवस्था केली.

मार्च महिना सुरू झाला असून उन्हाळ्याची चाहूल सुरू झाली आहे. उष्णतेचे प्रमाण वाढत आहे. अशातच पक्ष्यांना पाण्याची,खाद्याची सोय शाळेच्या आवारातील झाडावर घरटे बनवून करण्यात आली आहे. चिमणी दिवसाचे औचित्य साधून १५ पाणीपात्र व खाद्याचे पात्र लावण्यात आले.

शाळेतल्या परिसरातील पक्ष्यांचे संगोपन करण्यात यावे, यासाठी शाळेचे शिक्षक दशरथ आसपवार यांच्या पुढाकाराने मुख्याध्यापक श्रीकांत जोशी यांच्या मुख्य मार्गदर्शनात हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका अनिता बेले, गीता पाझारे ,सुचिता थोरात, शिक्षकेतर कर्मचारी किशोर बेहेरे ,चंदन बंड,प्रकाश बोरकर,सुनील उपरे ,सुनील सिडाम व शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: Students kept water and food containers for the birds in the school premises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.