पाऊणेदोन हजारांवर विद्यार्थी प्राविण्यश्रेणीत
By admin | Published: June 18, 2014 12:07 AM2014-06-18T00:07:26+5:302014-06-18T00:07:26+5:30
यंदाच्या दहावीच्या परीक्षेत जिल्ह्यात तब्बल दोन हजार ८९९ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य प्राप्त केले आहे. ८ हजार ३९२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. ११ हजार ४६ विद्यार्थी द्वितीय
चंद्रपूर : यंदाच्या दहावीच्या परीक्षेत जिल्ह्यात तब्बल दोन हजार ८९९ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य प्राप्त केले आहे. ८ हजार ३९२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. ११ हजार ४६ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत तर तीन हजार ३५१ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले.
विदर्भात चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल तिसऱ्या क्रमांकावर आहे. मागील वर्षी जिल्हा निकालात चवथ्या क्रमांकावर होता.
ँमागील वर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी दहावीच्या परीक्षेत आपल्या हुशारीची चुणूक दाखविली. दहावीच्या परीक्षेत एकूण १६ हजार ३५५ मुलांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती.यातील १६ हजार २४२ मुलांनी परीक्षेला बसले. यातील १२ हजार ९२२ मुले उत्तीर्ण झालीे. उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ७९.५५ आहे.
१५ हजार ३९५ मुलींनी परीक्षेसाठी नोंदणी केली. यातील १५ हजार ३३४ मुलींनी परीक्षा दिली. पैकी १२ हजार ७६६ मुली उत्तीर्ण झाल्या. उत्तीर्ण मुलींची टक्केवारी ८३.२५ आहे.
तालुकानिहाय निकालाची टक्केवारी बघता यंदा शहरी विद्यार्थ्यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांच्या तुलनेत चांगला निकाल दिला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातून जिवती तालुक्याचा निकाल सर्वाधिक म्हणजे, ९७.२८ टक्के लागला आहे तर चिमूर तालुका ७४.७२ टक्के घेत पंधराव्या क्रमांकावर फेकला गेला आहे. वरोरा, राजुरा, पोंभूर्णा, ब्रह्मपुरी या तालुक्यांनी चांगला निकाल दिला आहे. (नगर प्रतिनिधी)े