विद्यार्थ्यांनी गुणवत्तेसोबतच क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात चमकावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 11:53 PM2017-12-25T23:53:40+5:302017-12-25T23:54:07+5:30

केंद्र व राज्याचे शैक्षणिक धोरण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचे आहे. त्यासाठी शासनासोबतच शिक्षकांनीही उत्तरदायित्व स्वीकारले पाहिजे.

Students should be well-versed in sports and cultural fields | विद्यार्थ्यांनी गुणवत्तेसोबतच क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात चमकावे

विद्यार्थ्यांनी गुणवत्तेसोबतच क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात चमकावे

Next
ठळक मुद्देहंसराज अहीर : नांदगाव (पोडे) येथे बालक्रीडा व सांस्कृतिक महोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : केंद्र व राज्याचे शैक्षणिक धोरण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचे आहे. त्यासाठी शासनासोबतच शिक्षकांनीही उत्तरदायित्व स्वीकारले पाहिजे. शिक्षकांनी कल्पकतेतून गुणवत्ता वाढीसोबतच क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात पुढाकार घेतल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थी निश्चितपणे चमकतील, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सोमवारी नांदगाव (पोडे) येथे क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी केले.
बल्लारपूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय बाल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा २५ ते २८ डिसेंबर दरम्यान नांदगाव (पोडे) येथे सुरू आहे. अध्यक्षस्थानी बल्लारपूर पंचायत समितीचे सभापती गोविंदा पोडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपसभापती इंदिरा पिपरे, जिल्हा परिषद सदस्य हरिश गेडाम, वैशाली बुद्धलवार, पंचायत समिती सदस्य विद्या गेडाम, सोमेश्वर पद्मगिरीवार, गटविकास अधिकारी संध्या दिकोंडवार, नांदगावचे सरपंच प्रमोद देठे, उपसरपंच मल्लेश कोडारी, मनपाचे नगरसेवक राहूल सराफ, शाम कनकम, माजी जि.प. सदस्य मनोहर देऊळकर, प्राचार्य नरेंद्र बोबडे, माजी सरपंच मधुकर पोडे, गुलाब उपरे, तंमुस अध्यक्ष संजय टेकाम, सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ मुक्के, सुनील शेंडे, आदींची उपस्थिती होती.
ना. अहीर म्हणाले, सर्वशिक्षा अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शिक्षण शहराच्या तुलनेत मागे राहू नये म्हणून प्रगत शैक्षणिक धोरण राबविले जाते आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा डीजिटल केल्या आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थी आदर्श घडावा, हाच या स्पर्धेचा हेतू आहे. पहिल्या वर्गापासून आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन दिले जात आहे. विद्यार्थ्यांच्या बालमनावर स्वच्छता राखण्यासाठी आतापासून संस्कार करण्याची गरज असून निरामय आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचेही ना. अहीर यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी शोभा मडावी तर संचालन क्रीडा सचिव दिलीप इटनकर यांनी केले. स्पर्धेत विविध शाळा सहभागी झाल्या आहेत.
पाचशे विद्यार्थ्यांचा रंगणार सांस्कृतिक सोहळा
बल्लारपूर पंचायत समितीच्या विसापूर व कोठारी बिटातील २८ जिल्हा परिषद शाळेतील सुमारे ५४० विद्यार्थ्यांचा नांदगाव (पोडे) येथील क्रीडांगणावर क्रीडा व सांस्कृतिक सोहळा रंगणार आहे. दर्शनीय कवायतीच्या माध्यमातून चिमुकल्या बालकांनी देखणी व उत्कृष्ठ कला प्रदर्शित करून साºयांचे लक्ष वेधले. कबड्डी, खो-खो, वैयक्तीक व सांघिक सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी नांदगाव (पोडे) व परिसरातील नागरिकांना सोहळ्यातून मिळणार आहे.

Web Title: Students should be well-versed in sports and cultural fields

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.