विद्यार्थ्यांनी डोळ्यासमोर ध्येय ठेवावे
By admin | Published: July 17, 2014 11:59 PM2014-07-17T23:59:44+5:302014-07-17T23:59:44+5:30
महाविद्यालयीन जीवनात प्रवेश करताना विद्यार्थ्यांनी सदैव डोळ्यासमोर ध्येय ठेवावे. तेव्हाच पुढील जीवनात यशस्वी व्हाल, असे मनोगत प्राचार्य डॉ. जे.ए. शेख यांनी व्यक्त केले.
संवाद कार्यक्रम : जे.ए.शेख यांचे प्रतिपादन
चंद्रपूर : महाविद्यालयीन जीवनात प्रवेश करताना विद्यार्थ्यांनी सदैव डोळ्यासमोर ध्येय ठेवावे. तेव्हाच पुढील जीवनात यशस्वी व्हाल, असे मनोगत प्राचार्य डॉ. जे.ए. शेख यांनी व्यक्त केले.
स्थानिक सरदार पटेल महाविद्यालयामध्ये वाणिज्य विभागाद्वारे प्रथम वर्गात प्रवेशित विद्यार्थ्यांशी संवाद साधावा, यासाठी आयोजित प्राचार्य- प्राध्यापक- विद्यार्थी यांच्या संयुक्त सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपिठावर उपप्राचार्य डॉ. एल. व्ही. शेंडे, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. आर. पी. इंगोले, विज्ञान विभाग प्रमुख प्रा. स्वप्नील माधमशेट्टीवार, वरिष्ठ प्राध्यापक डॉ. प्रकाश सोमलकर, डॉ. के. बी.मोहरील आदींची उपस्थिती होती.
ते पुढे म्हणाले, वाणिज्य विभाग हा गोंडवाना विद्यापीठातील शंभर टक्के आचार्य पदवी प्राप्त नियमित प्राध्यापक असलेला विभाग असून विद्यार्थ्यांसाठी ही अभिमानाची बाब आहे. अशा प्राध्यापकांकडून तुम्ही शिकणार असल्यामुळे तुम्ही उत्तम विद्यार्थी म्हणून तयार व्हावे, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. महाविद्यालयीन शिस्तीच्या अनुषंगाने काही सूचनाही यावेळी प्राचार्यानी विद्यार्थ्यांना केल्या.
प्रास्ताविकेतून वाणिज्य विभागप्रमुख डॉ. आर. पी. इंगोले यांनी संयुक्त सभा आयोजनामागची भूमिका विषद केली. विद्यार्थी व पालकांनी या महाविद्यालयात प्रवेशाला पहिली पसंती दिल्याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करीत सर्व पालकांचे आभार मानले. महाविद्यालयाद्वारे आयोजित सर्व विद्यार्थीभिमुख उपक्रमात विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन यावेळी विद्यार्थ्यांन केले.
संचालन प्रा. तृप्ती वानखेडे यांनी केले तर आभार वरिष्ठ प्राध्यापक डॉ. प्रकाश सोमलकर यांनी मानले. या संयुक्त सभेत वाणिज्य विभागातील सर्व प्राध्यापकांची व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)