अभ्यासिकेतून विद्यार्थ्यांचे आयुष्य घडावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 11:35 PM2017-09-24T23:35:23+5:302017-09-24T23:35:36+5:30

विद्यादानाचे व विद्या आत्मसात करण्याचे महत्त्व आयुष्यभर आपल्या वाणीतून व कृतीतून दर्शवणारे भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचे सच्चे अनुयायी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांना खरी आदरांजली......

Students should learn from the study room | अभ्यासिकेतून विद्यार्थ्यांचे आयुष्य घडावे

अभ्यासिकेतून विद्यार्थ्यांचे आयुष्य घडावे

Next
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृहात सूसज्ज अभ्यासिका

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : विद्यादानाचे व विद्या आत्मसात करण्याचे महत्त्व आयुष्यभर आपल्या वाणीतून व कृतीतून दर्शवणारे भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचे सच्चे अनुयायी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांना खरी आदरांजली या वास्तुतील ही अभ्यासिका आहे. चंद्रपुरातील गरजू, हुशार, चिकित्सक व अभ्यासू मुलांच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून हे काम आपण करू शकलो, याचा मनस्वी आनंद असल्याचे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रविवारी येथे केले.
बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांची २५ सप्टेंबरला जयंती आहे. त्यांना मान्यवरांनी रविवारी अभिवादन केले. १४ जुलै रोजी बाबूपेठमधील बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृहाचे लोकार्पण पालकमंत्री मुनगंटीवार यांनी केले होते. यावेळी त्यांनी या सभागृहाच्या बेसमेंटमध्ये अद्यावत अभ्यासिका उभारण्याची घोषणा केली होती. त्यानंतर अवघ्या दोन महिन्यात त्याचे लोकार्पण झाले. या विक्रमी वेळेतील कामाच्या पूर्ततेसाठी पालकमंत्र्यांनी महानगर पालिकेला धन्यवाद दिलेत.
या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर केंद्रिय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, आमदार नाना शामकुळे, महापौर अंजली घोटेकर, मनपा आयुक्त संजय काकडे, उपमहापौर अनिल फुलझेले, स्थायी समिती सभापती राहुल पावडे, सभापती अनुराधा हजारे, सभागृह नेता वसंत देशमुख उपस्थित होते. तसेच खोब्रागडे कुटुंबातील मृणालिनी गिरीष खोब्रागडे, गौतमी डोंगरे, देशक खोब्रागडे, सत्यजित खोब्रागडे, प्रवीण खोब्रागडे, या स्मारकासाठी जागा देणारे स्नेहल देवानंद रामटेके, प्रतिक डोरलीकर आदी उपस्थित होते .
यावेळी बोलताना पालकमंत्र्यांनी चंद्रपूर शहरात शामाप्रसाद मुखर्जी व बाबा आमटे अभ्यासिकेनंतर बाबूपेठ परिसरात बॅरिस्टर खोब्रागडे सभागृहात आणखी एक अभ्यासिका उभी राहत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. जिल्ह्यातील भावी पिढीसाठी अभ्यासिका महत्त्वपूर्ण कार्य आहे. मूल येथे उभारण्यात आलेल्या शामा प्रसाद मुखर्जी अभ्यासिकेतील मुलांना अभ्यासाची ओढ लागल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. चंद्रपूर जिल्हयातील मुले जेव्हा या अभ्यासिकेतून अभ्यास करून केंद्र्र, राज्य व शासनाच्या विविध सेवा परीक्षेतून विविध पदावर नियुक्त होतील. ती खरी बॅरिस्टर साहेबांना श्रद्धांजली ठरेल. आपल्यालाही समाधान मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. ज्यांच्या घरात अभ्यासासाठी जागा नाही, वातावरण नाही, शांतता नाही, मात्र शिक्षणाच्या माध्यमातून परिस्थिती बदलण्याची जिद्द आहे. अशा जिद्दी, गुणवान व गरजू विद्यार्थ्यांसाठी ही जागा उपयोगी पडणार आहे, याचे समाधान असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयुक्त संजय काकडे यांनी तर संचालन नगरसेविका सविता कांबळे यांनी केले. यावेळी नगरसेविका वंदना तिखे, शितल गुरुनुले, पुष्पा उराडे, माया उईके, वंदना जांभूळकर, निलिमा आकेवार, ज्योती गेडाम, आशा आबुजवार आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी कार्य- हंसराज अहीर
रस्ते, विकास, पायाभूत सुविधांचे निर्माण, यासोबतच गुणवान, अभ्यासू विद्यार्थांसाठी अभ्यासिका निर्मितीचे प्रेरणादायी काम जिल्हयात सुरू आहे, याचा विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होईल, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. ही अभ्यासिका परिसरातील सर्व स्तरातील जनतेच्या ज्ञानार्जनासाठी कामी येईल, असे त्यांनी सांगितले. आमदार नाना शामकुळे यांनी विक्रमी वेळेत पालकमंत्री महोदयांच्या आश्वासनाची पूर्तता झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. महापौर अंजली घोटेकर यांनी पालकमंत्री यांनी दिलेल्या अभिवचनाला वेळेत पूर्ण करू शकलो, याचे समाधान व्यक्त केले. हे काम विक्रमी वेळेत पूर्ण करणारे महापालिकेचे आयुक्त संजय काकडे, उपायुक्त विजय देवळीकर, अभियंता विजय बोरीकर, अभियंता महेश बारई या टीमला शब्दसुमनाने गौरविण्यात आले.
 

Web Title: Students should learn from the study room

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.