विद्यार्थ्यांनी विकासाचे धडे घ्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 10:48 PM2019-02-11T22:48:11+5:302019-02-11T22:48:31+5:30

शाश्वत विकासासाठी आजच्या तरुणाईने विधायक कामांचे धडे घ्यावे. यातून जिल्ह्यातील ग्रामीण भागाचे चित्र बदलेल. शाश्वत स्वच्छतेची मोहीम गतिमान होईल, असे प्रतिपादन जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण जिल्हा परिषद अंतर्गत ज्युबिली विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात पार पडलेल्या जिल्हास्तरीय स्वच्छतामित्र वक्तृत्व करंडक स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.

Students should take lessons in development | विद्यार्थ्यांनी विकासाचे धडे घ्यावे

विद्यार्थ्यांनी विकासाचे धडे घ्यावे

googlenewsNext
ठळक मुद्देजितेंद्र पापळकर : जिल्हास्तरीय स्वच्छतामित्र वक्तृत्व करंडक स्पर्धा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शाश्वत विकासासाठी आजच्या तरुणाईने विधायक कामांचे धडे घ्यावे. यातून जिल्ह्यातील ग्रामीण भागाचे चित्र बदलेल. शाश्वत स्वच्छतेची मोहीम गतिमान होईल, असे प्रतिपादन जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण जिल्हा परिषद अंतर्गत ज्युबिली विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात पार पडलेल्या जिल्हास्तरीय स्वच्छतामित्र वक्तृत्व करंडक स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) विजय पचारे, प्राचार्य काळबांडे, निवृत्त जिल्हा क्रीडा अधिकारी चचाणे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक संजय धोटे, विस्तार अधिकारी गणेश चव्हाण, रामटेके, ज्युबिली विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षिका पुष्पा कोठेवार, मोरे उपस्थित होते. जिल्हास्तरीय स्वच्छतामित्र वक्तृत्व करंडक स्पर्धेच्या स्वरूपाची माहिती स्वच्छ भारत मिशनचे माहिती शिक्षण संवाद तज्ज्ञ कृष्णकांत खानझोडे यांनी दिली. मुख्य कार्यकारी पापळकर म्हणाले, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत घेण्यात येणारी स्पर्धा महाविद्यालयीन युवकांना प्रेरणा देणारी आहे. स्वच्छतामित्र वक्तृत्व करंडक स्पर्धेतील स्पर्धकांनी प्रत्येक तालुक्यात स्वच्छतेची चळवळ निर्माण करावी. राज्यस्तरीय स्पर्धेत जिल्ह्याचे नाव लौकिक करावे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. ही स्पर्धा कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन गटामध्ये घेण्यात आली. कनिष्ठ महाविद्यालयीन गटामधून प्रथम मोनाली इद्र्रदास बदकी, द्वितीय निश्चय ठवरदास उराडे, तर तृतीय पुरस्कार सुषमा बबन जवादे यांनी पटकविला आहे.
वरिष्ठ महाविद्यालयीन गटातून प्रथम पुरस्कार आकाश दिवाकर कडू, द्वितीय मोनाली पुंडलिक ठाकरे, तृतीय पवनलाल हुकरे यांनी मिळविला. विजेत्यांना स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) पचारे म्हणाले, तरूणांमध्ये विधायक कार्य करण्याची प्रचंड शक्ती असते. शासनाच्या विविध योजनांमधून त्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य केल्या जात आहे. पालकांनी मुलांशी संवाद ठेवून चांगल्या कार्यात मदत करावी, असेही त्यांनी सांगितले. तालुकास्तरावरून जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. संचालन मोरेश्वर बारसागडे यांनी केले. माहिती शिक्षण संवाद सल्लागार प्रवीण खंडारे यांनी आभार मानले. अधिकारी असे मत मांडले. यावेळी विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.

Web Title: Students should take lessons in development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.