एटीकेटीचे उत्तीर्ण विद्यार्थी बारावी परीक्षेपासून वंचित राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:52 AM2021-03-04T04:52:48+5:302021-03-04T04:52:48+5:30
ज्या विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन सुविधा उपलब्ध नव्हती ते विद्यार्थी व नोव्हेंबर २०२० ला उत्तीर्ण झालेले विद्यार्थी हे एकाच दिवसी ४ ...
ज्या विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन सुविधा उपलब्ध नव्हती ते विद्यार्थी व नोव्हेंबर २०२० ला उत्तीर्ण झालेले विद्यार्थी हे एकाच दिवसी ४ जानेवारी २०२१ पासून वर्गात आले. तेव्हा ऑनलाइन सुविधा नसलेल्यांना संधी मिळाली; परंतु एकाच तारखेला वर्गात येणाऱ्या एटीकेटीच्या विद्यार्थ्यांना संधी नाकारणे, हा त्यांच्यावर झालेला अन्याय आहे.
कोविड-१९ च्या वाढलेल्या प्रादुर्भावामुळे जुलै २०२० ची परीक्षा पुढे ढकलण्यात आली. ती परीक्षा ऑक्टोबर २०२० मध्ये घेऊन नोव्हेंबर २०२० मध्ये विद्यार्थ्यांची चूक नसताना परीक्षेपासून वंचित करणे हा त्यांच्यावरील अन्याय असल्याचे विजुक्टाने म्हटले आहे. या विद्यार्थ्यांना बारावीच्या एप्रिल- मे २०२१ मध्ये होणाऱ्या परीक्षेला बसू द्यावे, अशी मागणी विजुक्तातर्फे करण्यात आली आहे.
याबाबतचे निवेदन नागपूर विभागीय बोर्डाच्या सचिव माधुरी सावरकर यांच्यामार्फत शालेय शिक्षणमंत्री, राज्यमंत्री, आयुक्त, राज्य मंडळ अध्यक्षांना सादर केले आहे.