सरलद्वारे विद्यार्थ्यांची माहिती होणार ‘अपडेट’

By admin | Published: July 11, 2015 01:46 AM2015-07-11T01:46:26+5:302015-07-11T01:46:26+5:30

विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती संकलीत करणे, माहितीचे आदान-प्रदान करून सर्वंकक्ष माहिती एकत्रित करताना शिक्षकांसह कर्मचारी व अधिकाऱ्यांची दमछाक आता टळणार आहे.

Students will be informed about 'update' by simple | सरलद्वारे विद्यार्थ्यांची माहिती होणार ‘अपडेट’

सरलद्वारे विद्यार्थ्यांची माहिती होणार ‘अपडेट’

Next

राजकुमार चुनारकर खडसंगी
विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती संकलीत करणे, माहितीचे आदान-प्रदान करून सर्वंकक्ष माहिती एकत्रित करताना शिक्षकांसह कर्मचारी व अधिकाऱ्यांची दमछाक आता टळणार आहे. शिक्षण विभागाने यासाठी ‘सिस्टीमॅटीक अ‍ॅडमिनिस्टेटीव्ह रिफार्मस अचिव्हिंग लर्नींग फॉर स्टुडंट्स’ (सरल) या कार्यप्र्रणालीचा अवलंब केला आहे.
याद्वारे शाळेची, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याची व प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती आॅनलाईन भरली जाणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांचा आधारकार्डला लिंक केल्याने वेळोवेळी ती माहिती ‘अपडेट’ केली जाणार आहे. यासाठी गुरूजींकडे स्मार्टफोन असणे गरजेचे असल्याने गुरुजी आता स्मार्ट बनणार आहेत.
विविध शाळांकडून शिक्षण विभागाला सातत्याने माहिती संलग्नीत होते. शैक्षणिक व प्रशासकीय नियोजनासाठी विविध अधिकाऱ्यांकडून वारंवार माहिती मागविली जात असल्याने शिक्षकांचा वेळ, श्रम व पैसा वाया जावून गुणवत्तापूर्ण शिक्षणावर शिक्षकाला लक्ष केंद्रीत करता येत नाही. संगणकावर सर्व माहिती संलग्नीत होणार असल्याने शाळानिहाय माहिती आता एका क्लीकवर उपलब्ध होणार आहे. गुणवत्तापूर्ण व ताजी माहिती मिळून सर्व माहिती आधारकार्डला लिंक होऊन ३० सप्टेंबरपूर्वी सर्व जिल्ह्यातील माहिती संलग्नीत होणार आहे.
शिक्षक, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापकांच्या वेळेचा अपव्यय होत असल्याबद्दल तक्रारी होत्या. एकदा माहिती दिली, पुन्हा तिच माहिती कशाला असे, उत्तर शिक्षकांकडून बोलल्या जात होते. तर स्टेशनरीही व्यर्थ जात असल्याच्या तक्रारीसुद्धा शिक्षकांकडून येत होत्या. आरटीआई कायद्यानुसार सर्व मुलांना मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण मिळण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार दरवर्षी ३० सप्टेंबरला विशिष्ट रकाण्यात माहिती दिली जाते. त्यात विद्यार्थीनिहाय माहिती उपलब्ध होत नाही. त्यामुळे माहितीची गरज पडली की, शिक्षक मुख्याध्यापकांच्या नावाने आदेश काढावा लागत होता. मात्र आता या सरल प्रणालीमुळे शिक्षकांना अशा आदेशापासून सुटका मिळणार आहे.
येत्या काही महिन्यात सर्व विद्यार्थी आधारकार्डधारक होत असल्याने विद्यार्थी, व्यक्ती, संस्था व शाळानिहाय माहिती अपलोड झाल्यावर नव्याने दाखल होणारी मुले, शिक्षक, कर्मचारी, सेवानिवृत्त, उत्तीर्ण होणारी मुले अशा प्रकारची माहिती काही सेकंदात उपलब्ध होणार आहे. त्यामुळे तिमाही, सहामाही व वार्षिक माहिती काढण्याची पद्धत आपोआप बंद होवून संगणकातून कॉफी काढली जाईल. ‘सिस्टीमॅटीक अ‍ॅडमिनिस्टेटीव्ह रिफार्मस अचिव्हिंग लर्नींग फॉर स्टुडंट्स’ (सरल) या तंत्राने पालकांना विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती आॅनलाईन पाहता येणार आहे. तसेच नव्या तंत्राने सर्व शाळांचे आरेखन केले जावून शैक्षणिक शिक्षण, पालक, विद्यार्थी, संस्थाचालक विविध माहिती तथा स्पर्धात्मक परीक्षांचे अर्ज सुद्धा आता शाळेतूनच आॅनलाईन भरले जाणार आहेत.

Web Title: Students will be informed about 'update' by simple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.