विद्यार्थ्यांना मिळणार शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 10:46 PM2019-06-03T22:46:56+5:302019-06-03T22:47:08+5:30

इयत्ता पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीत शिकणाऱ्या एक लाख ७९ हजार ७३६ विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक सत्र सुरू होताच पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तक मिळणार आहे. याकरिता जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने पुण्यातील बालभारतीकडे साडेअकरा लाख पाठ्यपुस्तकांची मागणी केली असून चंद्रपुरात पुस्तक दाखल झाले आहे. विशेष म्हणजे, यंदा पहिल्यांदाच बंगाली भाषिक विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके देण्यात येणार आहे.

Students will get the textbook on the first day of the school | विद्यार्थ्यांना मिळणार शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तक

विद्यार्थ्यांना मिळणार शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तक

googlenewsNext
ठळक मुद्देसाडेअकरा लाख पुस्तकांची नोंदणी : १ लाख ७९ हजार ७३६ विद्यार्थ्यांना लाभ

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : इयत्ता पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीत शिकणाऱ्या एक लाख ७९ हजार ७३६ विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक सत्र सुरू होताच पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तक मिळणार आहे. याकरिता जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने पुण्यातील बालभारतीकडे साडेअकरा लाख पाठ्यपुस्तकांची मागणी केली असून चंद्रपुरात पुस्तक दाखल झाले आहे. विशेष म्हणजे, यंदा पहिल्यांदाच बंगाली भाषिक विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके देण्यात येणार आहे.
जिल्हा परिषद, नगरपरिषद, महानगरपालिका, शासकीय, अनुदानित प्राथमिक शाळांमधील १ ते ५ वीत शिक्षणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक योजनेअंतर्गत प्रतिलाभार्थी २५० तसेच उच्च प्राथमिक शाळेतील ६ ते ८ वीत शिकणाऱ्यांना प्रति लाभार्थी ४०० रूपये दिल्या जाते.
विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून आता यू- डायस ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. यावरील विद्यार्थी संख्येच्या नोंदणीनुसार ई-बालभारती पोर्टल पाठ्यपुस्तकांची नोंदणी करण्याच्या सूचना समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालकांनी दिल्या होत्या.
मागीलवर्षी राज्यातील ३५ जिल्हा परिषदांपैकी ५ आणि २२ पैकी ३ महानगरपालिकांनी विहित मुदतीत पाठ्यपुस्तकांची नोंदणी न केल्याने शैक्षणिक सत्र सुरू होऊनही विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकापासून वंचित राहावे लागले होते. यंदा अशी समस्या उद्भवू नये, याकरिता आॅनलाईन नोंदणी करण्यात आली होती. जिल्ह्यात बंगाली माध्यमाच्या दोन शाळा आहेत. तेथील विद्यार्थ्यांनाही यावर्षिपासून पाठ्यपुस्तके देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पाठ्यपुस्तके पंचायत समितीला पाठविणार
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून यंदा पंचायत समित्यांनी बालभारतीकडे पाठ्यपुस्तकांची परस्पर नोंदणी केली. कोठारी आयोगाच्या शिफारशीनुसार १९६७ रोजी पुणे येथे बालभारतीची स्थापना झाली. मागीलवर्षी बालभारतीने राज्यभरात १ कोटी टेक्सबूक व अडीच कोटी वर्कबूक विद्यार्थ्यांना वितरीत केले होते. पोर्टलवर नोंदणी केलेल्या जिल्ह्यातील सर्वच पंचायत समित्यांमध्ये ही पाठ्यपुस्तके थेट पुण्यावरून पाठविण्यात येणार आहे.

Web Title: Students will get the textbook on the first day of the school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.