बिबी ग्रामस्थांचा आदर्श ग्राम घाटकुळला अभ्यास दौरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:30 AM2020-12-06T04:30:05+5:302020-12-06T04:30:05+5:30
पोंभुर्णा : कोरपना तालुक्यातील बिबी येथील ग्रामस्थांनी राज्यात आदर्श व जिल्ह्यात स्मार्ट ठरलेल्या घाटकुळ येथे अभ्यास दौरानिमित्त भेट दिली. ...
पोंभुर्णा : कोरपना तालुक्यातील बिबी येथील ग्रामस्थांनी राज्यात आदर्श व जिल्ह्यात स्मार्ट ठरलेल्या घाटकुळ येथे अभ्यास दौरानिमित्त भेट दिली. यावेळी गावाची यशोगाथा व माहिती जाणून घेतली. लोकसहभागातून झालेल्या विकास कामांची पाहणी केली. घाटकुळ येथील ग्रामस्थांनी बिबी येथील ग्रामस्थांचे स्वागत केले. अभ्यास दौऱ्यात कोरपना पं. स. सदस्य सविता काळे, संतोष उपरे, चंद्रशेखर चटप, हबीब शेख, स्वप्निल झुरमुरे, राजेश खनके यासह ४९ नागरिकांचा सहभाग होता.
पं.स.सदस्य सविता काळे म्हणाल्या, घाटकुळ गावाने लोकसहभागातून केलेली कामे कौतुकास्पद आहे. मेहनत घेणाऱ्या सर्व गावकऱ्यांमुळे गावाचे नाव जिल्हा व राज्यात नावलौकिक झाले आहे. गावाचा झालेला कायापालट व बघितलेला लोकसहभाग प्रेरणादायी आहे. आमच्या बिबी गावातील अविनाश पोईनकर ग्रामपरिवर्तक म्हणून या गावात कार्यरत होते, याबाबत त्यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी घाटकुळच्या माजी सरपंच प्रिती मेदाळे, बाल पंचायतीच्या सरपंच काजल राळेगावकर, जनहित व मराठा युवक मंडळाचे सदस्य उपस्थित होते. विशेषता बिबी देखील स्मार्ट ग्राम असून एका स्मार्ट गावाचा दुसऱ्या स्मार्ट गावात अभ्यास दौरा होणे हे आनंददायी असल्याचे मत घाटकुळ येथील ग्रामस्थांनी व्यक्त केले. संचालन राम चौधरी यांनी केले.