छटपूजेकरिता अनेक ठिकाणी जलकुंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 09:53 PM2018-11-11T21:53:20+5:302018-11-11T21:53:39+5:30

उत्तर भारतात महत्त्वपूर्ण मानला जाणारा छटपुजा उत्सव चंद्रपुरातही साजरा केला जातो. रविवारीपासून या उत्सवाला सुरूवात होणार असून उत्तर भारतीय महिलांकडून विविध कार्यक्रमांसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. या निमित्ताने विविध ठिकाणी जलकुंड निर्माण करण्यात आले.

Stumps in many places for Chhatpuja | छटपूजेकरिता अनेक ठिकाणी जलकुंड

छटपूजेकरिता अनेक ठिकाणी जलकुंड

Next
ठळक मुद्देविविध कार्यक्रमांची रेलचेल : उत्तर भारतीय महिलांमध्ये आनंद

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : उत्तर भारतात महत्त्वपूर्ण मानला जाणारा छटपुजा उत्सव चंद्रपुरातही साजरा केला जातो. रविवारीपासून या उत्सवाला सुरूवात होणार असून उत्तर भारतीय महिलांकडून विविध कार्यक्रमांसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. या निमित्ताने विविध ठिकाणी जलकुंड निर्माण करण्यात आले.
उत्तर भारतीय समुदायामध्ये हा सण पारंपरिक पध्दतीने साजरा करण्यासाठी पुढाकार घेतला जातो. चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील बहुतेक सर्वच तालुक्यांमध्ये उत्तर भारतीय नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. हा उत्सव तीन दिवस साजरा केला जातो. पहिला दिवशी नदी, नाल्याजवळ जलकुंड तयार करून पुजा केली जाते.
निसर्गाच्या सानिध्यात देवतेचे पुजन करून उपास करण्याची परंपरा आहे. या पूजेमध्ये विवाहित महिला सहभागी होतात. सुर्याला नमस्कार करून विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केल्या जातो. चंद्रपूर, दुर्गापूर घुग्घूस, बल्लारपूर, वरोरा, या शहरातील उत्तर भारतीय बांधव छटपुजेच्या आयोजनासाठी पुढाकार घेतात. या पुजेला हिंदू संस्कृतीमध्ये महत्त्व आहे. हिंदी भाषिक महिला मोठ्या श्रद्धेने तीन दिवस पूजाअर्चना करतात.

Web Title: Stumps in many places for Chhatpuja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.