स्टंटबाजी युवकाच्या जीवावर बेतली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 10:45 PM2019-04-15T22:45:01+5:302019-04-15T22:45:15+5:30

दुचाकी वाहनाने ट्रिपल सीट स्टंटबाजी करणे एका युवकाच्या जिवावर बेतले. एक युवक जखमीही झाला. सुदैवाने तिसरा युवक बचावला. मात्र या स्टंटबाजीमुळे मागून येणाऱ्या दुचाकीचा अपघात होऊन तोदेखील जखमी झाला. दोन्ही गंभीर युवकावर चंद्रपूरच्या जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहे. ही घटना रविवारी रात्री ११.३० वाजता येथील भवानी माता मंदिरासमोर घडली.

Stuttgart Stuck in the Battle of the Young | स्टंटबाजी युवकाच्या जीवावर बेतली

स्टंटबाजी युवकाच्या जीवावर बेतली

Next
ठळक मुद्देएकाचा जागीच मृत्यू : दोन जण गंभीर जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती : दुचाकी वाहनाने ट्रिपल सीट स्टंटबाजी करणे एका युवकाच्या जिवावर बेतले. एक युवक जखमीही झाला. सुदैवाने तिसरा युवक बचावला. मात्र या स्टंटबाजीमुळे मागून येणाऱ्या दुचाकीचा अपघात होऊन तोदेखील जखमी झाला. दोन्ही गंभीर युवकावर चंद्रपूरच्या जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहे. ही घटना रविवारी रात्री ११.३० वाजता येथील भवानी माता मंदिरासमोर घडली.
सुहास दादा आमटे (१९) असे मृतकाचे नाव आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेत हे युवक सहभागी झाले होते. जुन्या बसस्थानकावरील डॉ. आंबेडकर चौकात महाप्रसाद सेवन करून शिवाजी नगर येथील आपल्या दुचाकीने (क्रमांक एम.एच. ३४ एबी ००४५) सुहास दादा आमटे (१९), रक्षित प्रबुध्द पाझारे (१९) व अन्य १ असे तिघे जण रस्त्याने स्टंटबाजी करीत जात असताना अचानक रस्ता दुभाजकाला त्यांची दुचाकी आदळली. त्यात सुहास आमटे याचा जागीच मृत्यू झाला. तर रक्षीत जखमी झाला. आणि एकाला किरकोळ मार लागला. त्याचवेळी मागून आलेली दुसरी दुचाकी त्यांच्या दुचाकीला आदळली. यात दुसºया दुचाकीवरील नेहाल अशोक भागवत (२२) रा. शिवाजी नगर हा गंभीर जखमी झाला. दोन्ही जखमींना उपचारार्थ चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले. पुढील तपास ठाणेदार हृदयनारायण यादव यांच्या मागदर्शनात सुरू आहे.
युवकाचा अपघाती मृत्यू
आपल्या दुचाकीने वणी येथे गेलेल्या येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरातील सचिन शंकर लभाने (३२) याचा अपघाती मृत्यू झाला. सचिन लभाने हा वणी येथील आपले काम आटोपून आपल्या दुचाकीने भद्रावतीकडे येत असताना अपघात झाला. त्यात तो दगावला. ही घटना सोमवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.

Web Title: Stuttgart Stuck in the Battle of the Young

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.