चंद्रपुरात होणार गोंडवाना विद्यापीठाचे उपकेंद्र, ८.५३ एकर जागा मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2023 12:01 PM2023-06-16T12:01:57+5:302023-06-16T12:02:55+5:30

सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना यश

Sub-centre of Gondwana University to be built in Chandrapur, 8.53 acres of land approved | चंद्रपुरात होणार गोंडवाना विद्यापीठाचे उपकेंद्र, ८.५३ एकर जागा मंजूर

चंद्रपुरात होणार गोंडवाना विद्यापीठाचे उपकेंद्र, ८.५३ एकर जागा मंजूर

googlenewsNext

चंद्रपूर : गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाचे उपकेंद्र आता चंद्रपुरात साकारणार आहे. त्यासाठी ८.५३ एकर जागा मंजूर करण्यात आली. या विद्यापीठाच्या उपकेंद्राला शासनाकडून मान्यता मिळाली. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (एसएनडीटी) महिला विद्यापीठाचे उपकेंद्र बल्लारपूर–चंद्रपूर मार्गावर सुरू झाले असताना गोंडवाना विद्यापीठाचे उपकेंद्रही चंद्रपुरात येत आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना गोंडवाना विद्यापीठाचे मुख्यालय भौगोलिक अंतरामुळे लांब पडत होते. यासंदर्भात राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना डिसेंबर २०२२ मध्ये पत्र पाठवून गोंडवाना विद्यापीठ उपकेंद्र चंद्रपुरात स्थापन करण्याबाबत सूचना केली होती. ना. मुनगंटीवार यांचे पत्र प्राप्त होताच उच्च व तंत्रशिक्षण विभाग, गोंडवाना विद्यापीठ प्रशासन कामाला लागले.

जागाही झाली निश्चित

चंद्रपूर शहरातील बाबूपेठ मोहल्ला येथील खुली जागा गोंडवाना विद्यापीठाचे उपकेंद्र स्थापन करण्याच्या दृष्टीने उपलब्ध असल्याचे उपअधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालय, चंद्रपूर यांनी नमूद केले आहे. त्यानुसार ही जागा गोंडवाना विद्यापीठाच्या चंद्रपूर उपकेंद्रासाठी उपलब्ध करून देण्यात आली. जिल्ह्यात १५ तालुक्यांचा समावेश आहे. १३३ कॉलेज गोंडवाना विद्यापीठाशी संलग्न आहेत. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना विद्यापीठात जाण्यासाठी मोठे अंतर पार करावे लागत होते. आता चंद्रपुरातच गोंडवाना विद्यापीठाचे केंद्र स्थापन होणार असल्याचे विद्यार्थ्यांना होणारा त्रास वाचणार आहे.

Web Title: Sub-centre of Gondwana University to be built in Chandrapur, 8.53 acres of land approved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.